Corchorem Health Center  Dainik Gomantak
गोवा

अपुरी सामग्री, पंखे-दिवे गायब, डॉक्टर-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे; कुडचडे आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेवर काँग्रेस आक्रमक

अमित पाटकर : काकोडा-कुडचडे आरोग्य केंद्राची सुविधांविना परवड

गोमन्तक डिजिटल टीम

Corchorem Health Center काकोडा-कुडचडे आरोग्य केंद्रावर सांगे, सावर्डे, केपे, कुडचडे व जवळच्या धारबांदोडा भागातील नागरिक अवलंबून आहेत. असे असूनही नवीन आरोग्य केंद्र पूर्ण सुविधायुक्त करण्यासाठी सरकार केवळ चालढकल करीत आहे.

येत्या महिन्याभरात हॉस्पिटलच्या कारभारात सुधारणा न झाल्यास लोकांना घेऊन काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा गुरुवारी (ता.३१) प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला.

कुडचडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. मेघा कुडचडकर यांना घेराव घातल्यानंतर पाटकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पन्नासपेक्षा अधिक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

कुडचडे गट काँग्रेसने काकोडा-कुडचडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिस्थितीचा पाठपुरावा घेण्यासाठी आरोग्यधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

यावेळी आरोग्यधिकारी डॉ. मेघा कुडचडकर यांनी आपण काँग्रेस पक्षाने दिलेले निवेदन आरोग्य संचालकांना सादर करून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

काकोडा-कुडचडे आरोग्य केंद्रातील समस्या

  • अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे इतरांना त्याचा फटका बसतो.

  • डॉक्टर, प्रसूतीतज्ज्ञ, एक्सरे ऑपरेटर, कारकून, मल्टिटास्किंग कर्मचाऱ्यासहित एकूण तेवीस जागा रिक्त आहेत.

  • रुग्णांना सकस आहार का दिला जात नाही, असे पराग सबनीस यांनी विचारले असता अपुरा निधीपुरवठा असल्याचे स्पष्ट झाले.

  • एकच रुग्णवाहिका असल्यामुळे रुग्णांसाठी खासगी रुग्णवाहिकेचा वापर करावा लागतो.

  • आरोग्य केंद्रात बसण्यासाठी जागा नाही, पंखे नाहीत व पार्किंग जागेत अंधार आहे.

  • रुग्णांसोबत असणाऱ्यांना कँटिनची सोय नाही, पाणी नाही.

  • दीडशे रुग्णांसाठी फक्त दोन शौचालये असल्याने रुग्णांची गैरसोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT