Goa Cooperative Societies Report Dainik Gomantak
गोवा

Goa Cooperative Societies: सहकारी सोसायट्यांमधील ठेवींत 454 कोटींनी वाढ; थकीत कर्ज 258 कोटींनी वाढले, सरकारी अहवालातील निष्कर्ष

Goa Cooperative Societies Report: गोव्‍याला घटकराज्‍याचा दर्जा मिळाला, त्‍यावेळी राज्‍यात ६९० सहकारी सोसायट्या होत्‍या. २०२४-२५ मध्‍ये हा आकडा ५,५२५ इतका झाला होता.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्‍यातील सहकारी सोसायट्यांमधील ठेवींमध्‍ये वर्षभरात ४५४.५८, तर थकित कर्जांमध्‍ये २५८.६२ कोटींची वाढ झाल्‍याचे राज्‍य सरकारने याबाबत जारी केलेल्‍या अहवालातून समोर आले आहे.

गोव्‍याला घटकराज्‍याचा दर्जा मिळाला, त्‍यावेळी राज्‍यात ६९० सहकारी सोसायट्या होत्‍या. २०२४-२५ मध्‍ये हा आकडा ५,५२५ इतका झाला होता. त्‍यानंतरच्‍या वर्षभरात त्‍यात ८५ ने वाढ होऊन २०२५-२६ मध्‍ये हा आकडा ५,६१० इतका झाला.

२०२४-२५ मध्‍ये या सहकारी सोसायट्यांमध्‍ये ९,०९१.७२ कोटींच्‍या ठेवी जमा झाल्‍या होत्‍या. वर्षभरात त्‍यात ४५४.५८ कोटींची भर पडल्‍याने २०२५-२६ मध्‍ये हा आकडा ९,५४६.३० कोटींपर्यंत पोहोचल्‍याचे अहवालातून दिसून येते.

कर्ज वितरणात २५८.६२ कोटींची वाढ

राज्‍यात चालणाऱ्या सहकारी सोसायट्यांनी २०२४-२५ मध्‍ये नागरिकांना एकूण ५,१७२.४४ कोटींची कर्जे दिली होती. त्‍यानंतरच्‍या वर्षभरात कर्ज वितरणात २५८.६२ कोटींची वाढ होऊन २०२५-२६ मध्‍ये ५,४३१.०६ कोटींची कर्जे वितरित केली. परंतु, या काळात थकीत कर्जात २७२.६३ कोटींची वाढ झाली. २०२४-२५ मध्‍ये सहकारी सोसायट्यांमध्‍ये ५,४५२.६५ कोटींची कर्जे थकीत होती. तर, २०२५-२६ मध्‍ये हा आकडा ५,७२५.२८ कोटी इतका झाल्‍याचेही हा अहवाल सांगतो.

भागभांडवलासह नफा, तोट्यातही वाढ

राज्‍याला घटकराज्‍याचा दर्जा मिळाला, त्‍यावेळी सहकारी सोसायट्यांतील भागभांडवल केवळ १८.४९ कोटी होती. २०२४-२५ पर्यंत हे भागभांडवल ५४४.१९ कोटी झाले होते. त्‍यानंतरच्‍या वर्षभरात त्‍यात २७.२१ कोटींची वाढ होऊन २०२५-२६ मध्‍ये ते ५७१.४० कोटी झाल्‍याचे अहवालात म्‍हटले आहे.

२०२४-२५ पर्यंत सहकारी सोसायट्यांना २७९.११ कोटींचा नफा मिळाला होता. २०२५-२६ मध्‍ये त्‍यात १३.९६ कोटींनी वाढ होऊन हा नफा २९३.०७ कोटींवर गेला. तर, याच वर्षभरात सोसायट्यांना ८.१७ कोटींचा तोटा सहन करावा लागल्‍याचेही अहवालातून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT