Tirumala Tirupati Goa: ..अखेर ‘तिरुमला-तिरुपती’चे अध्यक्ष गोव्यात! सोसायटीविषयी कागदपत्रे केली सादर; सहकार मंत्र्यांसोबत बैठक

Tirumala tirupati credit society President: क्रेडिट सोसायटीच्या दोन संचालकांनी गुरुवारी सहकार निबंधक आशुतोष आपटे यांची भेट घेतली होती आणि आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याची हमी दिली होती.
Tirumala tirupati credit society
Tirumala tirupati credit societyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला राज्यात तेरा शाखा सुरू करण्यासाठी दिलेली ‘एनओसी‘ सहकार निबंधकांनी रद्द केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. त्यामुळे संस्थेतून पैसे काढण्यासाठी ग्राहकांची वर्दळ वाढल्याचे लक्षात येताच सोसायटीचे अध्यक्ष गुरमीत सिंग यांना शुक्रवारी गोवा गाठावे लागले.

क्रेडिट सोसायटीच्या दोन संचालकांनी गुरुवारी सहकार निबंधक आशुतोष आपटे यांची भेट घेतली होती आणि आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याची हमी दिली होती. त्याचबरोबर कालच सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सोसायटीचे संचालक शुक्रवारी आपणास भेटणार असल्याचे सांगितले होते.

त्यानुसार सोसायटीचे अध्यक्ष गुरुमीत सिंग व इतर संचालकांनी शिरोडकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सोसायटीविषयी काही कागदपत्रेही सादर केली आणि पुढील तपशील देण्यासाठी त्यांच्याकडे वेळही मागितला असल्याची माहिती समोर आली आहे.

Tirumala tirupati credit society
Tirumala Tirupati Goa: ‘तिरुमला’चे संचालक अखेर झुकले! ऑडिटसाठी कागदपत्रे सादर करण्‍याची दिली हमी; NOC रद्दमुळे दणका

मंत्री शिरोडकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीविषयी सिंग म्हणाले, सरकारकडे जी कागदपत्रे जमा करायला हवी होती, ती झाली नाहीत, ही मानवी चूक आहे. परंतु आता आम्ही कागदपत्रे सादर केली आहेत. आम्ही सरकारकडे ‘एनओसी’चे निलंबन रद्द करण्याची विनंती केल्याचे सांगितले. तसेच त्यांनी ठेवीदारांना घाबरून न जाण्याचे आवाहनही केले.

Tirumala tirupati credit society
Tirumala Tirupati Goa: ‘तिरुमला तिरुपती’चे गुंतवणूकदार धास्तावले! नियमभंग भोवला; राज्‍यभरातील विविध शाखांमध्‍ये पैशांसाठी झुंबड

या बैठकीनंतर मंत्री शिरोडकर यांनी सांगितले की, सहकारी संस्थांचे निबंधकांना सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करावी लागणार आहे. त्यानंतर ते मला अहवाल देतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com