Goa Construction | Bricks Dainik Gomantak
गोवा

Goa Construction: बांधकाम साहित्य मिळेना; कामगारांवर ओढवली उपासमारीची वेळ!

Goa Construction: बांधकाम साहित्य उपलब्ध होत नसल्याने बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Construction: बांधकाम साहित्य उपलब्ध होत नसल्याने बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. रेती, चिरे यासारख्या अत्यावश्यक बांधकाम साहित्याचा पुरवठा होत नसल्याने बांधकाम ठेकेदार आपल्याकडे असलेल्या कामगारांना काम देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना वेतनही देण्यास ते हतबल झाले आहेत.

कोरोना काळात बांधकाम व्यवसायातील काही परगावचे कामगार गावी परतले होते. मात्र, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर ते काम मिळेल या आशेने परतले होते. एका अंदाजानुसार बारा तालुक्यांत एक लाख कामगार परगावचे आहेत. त्यामध्ये सुतार, गवंडी, टाईल्स फीटर, प्लास्टर करणारे, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सिमेंट कॉंक्रिटचे काम करणारे व अन्य कामगारांचा समावेश आहे.

आज रेतीला पर्याय म्हणून खडीच्या भुकटीचा वापर करण्यात येतो. चिऱ्यांना पर्याय म्हणून सिमेंट ब्लॉकचा वापर करण्यात येतो. मात्र, सिमेंट ब्लॉक चिरे दुप्पट महाग असल्याने त्यांचा मर्यादित स्वरूपात वापर करण्यात येत आहे.

दक्षिण गोव्यात रेती, चिरे यासारखे प्राथमिक बांधकाम साहित्य उपलब्ध होत नसल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प झालेला असून त्याचा गंभीर परिणाम स्थानिक बांधकाम कामगारांवर झाला असल्याचे काणकोणमधील एक बांधकाम ठेकेदार अजय लोलयेकर यांनी सांगितले.

सरकारकडून गांभीर्याने विचार व्हावा

राज्यात बांधकाम साहित्याच्या उपलब्धतेविषयी सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सध्या चिरे, रेती हे बांधकाम साहित्य उपलब्ध होत नसल्याने अनेक खासगी बांधकामे ठप्प झाली आहेत. लोड बेअरिंग इमारत बांधकामांना चांगल्या प्रतिच्या चिऱ्यांशिवाय पर्याय नाही.

त्याचप्रमाणे रेती उत्खननासाठी अधिकृतपणे काही जलस्त्रोतांची पात्रे निश्चित व्हायला हवीत, असे मत आर्किटेक्ट योगेश प्रभुगावकर यांनी व्यक्त केले. सध्या सरकारी विकासकामे कोणते बांधकाम साहित्य वापरून करण्यात येतात. त्या बांधकामांच्या दर्जाविषयी अनेक प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Body shaming: बॉडी शेमिंगची शिकार झाली स्मृती मानधना, सलमान खानच्या 'त्या' लूकशी तुलना

Goa ZP Election Result 2025 Live Update: दक्षिणेत आणखी एका काँग्रेस उमेदवाराची बाजी; नुवेत ब्रागांझा यांचा 440 मतांनी विजय

Goa Crime: तोतया पोलिसांकडून 6 लाखांच्या मंगळसूत्रावर डल्ला, पिळगाव येथील महिलेची फसवणूक; अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Goa Special Train: ख्रिसमस, न्यू ईयरनिमित्ताने गोव्यासाठी धावणार विशेष ट्रेन; पंजाब, दिल्ली, गुजरात मुंबईतून मडगाव गाठणार, बुकिंग सुरु

VIDEO: पाकिस्तानचे निर्लज्ज कृत्य, बंदी घातलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या गाण्यावर खेळाडूंचा डान्स; विजयापेक्षा सेलिब्रेशनचीच चर्चा

SCROLL FOR NEXT