Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष; काँग्रेस नेते थेट राज्यपालांच्या भेटीला

तूर डाळ नासाडीबाबत माजी नागरी पुरवठा मंत्र्यांच्या बडतर्फीची केली मागणी

Sumit Tambekar

पणजी: काँग्रेस नेत्यांनी आज राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची भेट घेत भाजप सरकारने दुर्लक्षित केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले. या वेळी निवेदन देत काँग्रेस नेत्यांनी म्हादई नदीवरील बेकायदा बांधकाम स्थळ पाहणी करावी. तूर डाळीच्या नासाडीस जबाबदार माजी नागरी पुरवठा मंत्र्यांच्या बरखास्ती करावी आणि गोव्यातील रोजगाराच्या परिस्थितीवर श्वेतपत्रिका काढण्यासाठी सरकारला आदेश देण्याची मागणी केली.

(Goa Congress say Governor Sreedharan Pillai's focus on issues in Goa )

काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे की, म्हादई नदीचे संरक्षण करण्यासाठी, अन्नपदार्थांची होणारी नासाडी थांबवण्यासाठी आणि गोव्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सक्रिय पावले उचलण्यात अपयशी ठरल्याबद्दल गोव्यातील लोकांच्या मनात भीती आणि चिंता आहे. कर्नाटकने म्हादई खोऱ्यातील पाणी वळवण्यासाठी बंधाऱ्यांचे सुरू केलेले बेकायदेशीर बांधकाम आणि गोवा सरकारच्या निष्क्रियतेवर या निवेदनात प्रकाश टाकला आहे.

काँग्रेस पक्षाने आपल्या निवेदनात 242 मेट्रिक टन तूर डाळ आणि 10.3 मेट्रिक टन साखर वाया गेल्याच्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि माजी नागरी पुरवठा मंत्री आणि यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

गोव्यातील वाढत्या बेरोजगारीची टक्केवारी दर्शविणारे विविध अहवाल आणि लाखो नोकऱ्यांचे आश्वासन देणारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करणारी विधाने यामुळे राज्यातील विविध तरुण नैराश्यात गेले आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे . सुशिक्षितांमध्ये निराशेची पातळी चिंताजनकरित्या वाढत आहे व युवा वर्ग आता अंमली पदार्थांचे व्यसन आणि इतर वाईट गोष्टींकडे आकर्षित होत आहेत असे राज्यपालांच्या नजरेसमोर आणण्यात आले आहे.

गोव्यातील रोजगाराच्या परिस्थितीवर सरकारने खरी तथ्ये आणि आकडेवारी देणारी “श्वेतपत्रिका” जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती प्रक्रिया हाती घेण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी राज्यपालांना केली आहे. कॉंग्रेसने राज्यपालांच्या तात्‍काळ हस्तक्षेपाची मागणी करीत वरील तीनही मुद्द्यांवर सरकारला आवश्‍यक निर्देश जारी करण्‍याची विनंती आज सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT