Goa Panchayat Election: पेडणे तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीचे उद्या मतदान

निवडणूक आयोगाकडून सर्व तयारी पुर्ण
Panchayat Election
Panchayat ElectionDainik Gomantak

पेडणे तालुक्यात एकूण 17 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्व तयारी पुर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान साहित्य वितरित केले. यासाठी अधिकारी व कर्मचारी, अपंगांसाठी साहित्य,वाहने तैनात करण्यात आली आहेत.

( Polling tomorrow for 17 Gram Panchayats in Pernem Taluk )

Panchayat Election
Aam Aadmi Party : गोव्यात ‘आप’ला राज्य पक्ष म्हणून मान्यता

मतदान पेट्या व मतपत्रिका याशिवाय इतर साहित्य मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पंचायत कार्यक्षेत्रात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी रवींद्र भवन बायणा येथे होणार आहे.

Panchayat Election
राज्यातील प्रशासकांमुळे विकासकामे खोळंबली

Goa panchayat Election 2022: कोविडबाधित नागरिक ही करणार मतदान

गेले काही दिवस पंचायत निवडणुकीने गोव्याच्या राजकारणात रंगत चढली आहे. बाजी मारणार कोण ? यासाठी सर्व पक्ष ताकदीने उतरले असून काल प्रचाराचा अखेर झाला. उद्या मतदान असल्याने आता प्रचाराच्या फैरी म्यान झाल्या आहेत.

मात्र उद्या मतदान असल्याने सर्व उमेदवारांचा निकाल दोन दिवसात लागणार आहे. असे असले तरी या निवडणूकीत आता कोरोना रुग्ण ही मतदान करणार आहेत. निवडणुक आयोगाने 186 पंचायतीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून 10 ऑगस्टला मतदान होणार आहे. 10 तारखेला मतदान व 12 ऑगस्टला मतमोजणी घेण्यात येणार आहे.

18 ते 27 अर्ज स्वीकारले पंचायत निवडणुकीसाठी यापूर्वीच वर्गीकृत जाती-जमाती, इतर मागासवर्गीय वर्गाच्या आरक्षणाच्या मुद्याने बराच वेळ हा मुद्दा न्यायलायत प्रलंबित होता. मात्र आता हे मुद्दे निकालात निघाला असून 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतमोजणीने या निवडणूकिचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com