Amit Palekar : गोव्यात सध्या शाळांच्या विलिनीकरणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारने शाळा विलिनीकरणाबाबत पावलं उचलल्याची कुणकुण लागताच चहुबाजूंनी टिकेची झोड उठू लागली. यानंतर एक पाऊल मागे येत सरकारने सर्वांना विचारात घेऊन चर्चेअंतीच निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं. आता आम आदमी पक्षानेही या वादात उडी टाकली आहे.
विलीन होणाऱ्या शाळा 'आप'ला दत्तक द्या, अशी मागणी आम आदमी पार्टीकडून करण्यात आली आहे. आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी तशा आशयाचं पत्रच शिक्षण संचालकांना दिलं आहे. त्यामुळे पंचायत निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. शाळा विलिनीकरणाच्या मुद्द्यावरुन सरकारला सर्वपक्षीय नेत्यांसह विद्यार्थी आणि पालकांनीही घेरण्यास सुरु केल्याचं चित्र आहे.
कमी पटसंख्येचे कारण देत राज्यातील 245 एकशिक्षकी सरकारी शाळांच्या विलिनीकरणाचा सरकारने घाट घातला आहे. त्याला सामाजिक पातळीवरून तीव्र विरोध होऊ लागला आहे. गावागावांतून उत्स्फूर्तपणे पालकांच्या बैठका होत असून, मराठीप्रेमी नेतेही जनआंदोलनाची रूपरेषा आखत आहेत. राजकीय पक्षांसह ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे उमेदवारही सरकारी शाळा वाचविण्यासाठी उघड पाठिंबा देत आहेत. परिणामी सरकारला निर्णयाप्रती पुनर्विचार करावा लागण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.