Campal Football Ground Dainik Gomantak
गोवा

Campal Football Ground: 'कांपाल'प्रकरणी काँग्रेसचा एल्गार; 20 दिवसांत निर्णय मागे घ्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा

Goa Congress Protest: अमरनाथ पणजीकर यांनी भाजप सरकारवर सार्वजनिक मालमत्तेचे व्यापारीकरण करण्याचा आरोप केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: कांपाल येथील नव्याने विकसित करण्यात आलेले फुटबॉल मैदान व क्रीडा संकुल खासगी संस्थेला भाडेपट्टीवर देण्याच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात गोवा प्रदेश काँग्रेस समितीने बुधवारी (ता.१) तीव्र आंदोलन केले.

या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा, अन्यथा राज्यभर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने दिला. यावेळी पक्षाच्या शिष्टमंडळाने गोवा राज्य नागरी विकास संस्थेच्या (जीसुडा) कार्यालयाला घेराव घालत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

कॉंग्रेसचे माध्यम व जनसंपर्क विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, प्रवक्ते ॲड. अमित पालेकर, युवा काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतीक्षा खलप, सेवा दलाचे प्रमुख राजन घाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे की, सुमारे ४० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर जवळपास ३० कोटी रुपये सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेले कांपाल क्रीडा संकुल हे गोव्यातील युवकांसाठी उभारलेले सार्वजनिक संपत्तीचे प्रतीक आहे. अशा सुविधेचे व्यापारीकरण करून ती खासगी संस्थेकडे सोपविणे योग्य ठरणार नाही.

काँग्रेसने अखेरीस स्पष्ट केले की, करदात्यांच्या पैशातून उभारण्यात आलेली सार्वजनिक क्रीडा पायाभूत सुविधा खासगी नफ्यासाठी वापरण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. ‘गोवा विक्रीसाठी नाही, कांपाल मैदान विक्रीसाठी नाही. हा निर्णय मागे घेतला जाईपर्यंत काँग्रेस जनतेसोबत खांद्याला खांदा लावून लढत राहील,’ असा निर्धार पक्षाने व्यक्त केला.

सार्वजनिक मालमत्तेचे व्यापारीकरण

अमरनाथ पणजीकर यांनी भाजप सरकारवर सार्वजनिक मालमत्तेचे व्यापारीकरण करण्याचा आरोप केला. गोव्यातील प्रत्येक सार्वजनिक मालमत्ता ही सरकारसाठी व्यवसायाची संधी बनली आहे. कांपाल मैदान हे ठेकेदार किंवा खासगी कंपन्यांचे नसून गोव्यातील जनतेचे आहे. हा प्रस्ताव मागे घेतला नाही तर काँग्रेसचे आंदोलन तीव्र होईल, असा इशारा त्यांनी दिला.

युवकांच्या भवितव्याशी खेळ!

ॲड. अमित पालेकर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करताना सार्वजनिक मालमत्ता खासगी संस्थांकडे सोपविण्याची सवयच सरकारला लागल्याचा आरोप केला. गोवा विक्रीसाठी नाही. आज कांपाल मैदान खासगीकरणाच्या मार्गावर आहे. उद्या इतर सार्वजनिक मालमत्ताही अशाच पद्धतीने खासगी हातात दिल्या जातील. युवकांच्या भवितव्याशी फुटबॉल खेळण्याचा सरकारचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT