Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Congress Kota Factory Campaign: सध्याची शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना नैराश्य आणि मानसिक तणावाकडे ढकलत असल्याचा आरोपही करण्यात आला.
Goa Congress Kota Factory Campaign
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: देशातील ढासळती शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, वाढती बेरोजगारी आणि कोचिंग क्लासेसच्या व्यापारीकरणाविरोधात उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीने ‘कोटा फॅक्टरी : छात्रों की गूंज’ हे विशेष अभियान सुरू केले आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. शशांक नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी राज्यभर जनजागृती केली जाणार आहे.

म्हापसा येथील काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला ॲड. शशांक नार्वेकर, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते विवेक डिसिल्वा, शिवोली गटाध्‍यक्ष पार्वती नागवेकर, युवक काँग्रेस सरचिटणीस सायडन फर्नांडिस, उत्तर गोवा एनएसयूआयचे अध्यक्ष सदाशिव बडिगर आणि म्हापसा युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर सावर उपस्थित होते.

Goa Congress Kota Factory Campaign
Margao Konkan Railway Station: मडगाव 'कोकण रेल्वे' स्थानकाचा लवकरच कायापालट! 200 कोटी मंजूर; दुप्पट रेल्वेंचे परिवहन शक्य

काँग्रेस नेत्यांनी विद्यार्थ्यांवर वाढत चाललेले अभ्यासाचे ओझे, वारंवार होणारी पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च, कोचिंग क्लासेसवरील अवलंबित्व आणि पदवी मिळूनही रोजगाराची अनिश्चितता याबद्दल यावेळी तीव्र चिंता व्यक्त करण्‍यात आली.

सध्याची शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना नैराश्य आणि मानसिक तणावाकडे ढकलत असल्याचा आरोपही करण्यात आला. गोव्यातील विद्यार्थी, तरुण आणि पालकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले.

Goa Congress Kota Factory Campaign
Goa MSME Industry: राज्यातील सूक्ष्म, लघु उद्योग बंद पडण्यामागील कारणं द्या! काँग्रेसची सरकारकडे मागणी; जीएसटी बचत उत्सवावरही साधला निशाणा

काय आहेत प्रमुख मागण्या?

स्पर्धा परीक्षांमध्ये पूर्ण पारदर्शकता व पेपरफुटीला आळा

सार्वजनिक शिक्षणासाठी सरकारी गुंतवणूक वाढवावी

शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत

पदवीधरांसाठी रोजगाराच्या संधी वाढवाव्यात

शैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशन सेवा बळकट करून विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com