Goa Congress Tribute, Pahalgam Attack Victims Dainik Gomantak
गोवा

Pahalgam Attack: दहशतवाद्यांच्या कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच! पाटकरांचे प्रतिपादन; गोवा काँग्रेसतर्फे कँडल मार्च

Goa Congress: पहलगाम येथील मृतांना काँग्रेस पक्षाच्यावतीने देशभर आदरांजली वाहण्यात आली आहे. दक्षिण गोव्यातही काँग्रेसच्यावतीने आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

Sameer Panditrao

पणजी: पहलगाम येथील मृतांना काँग्रेस पक्षाच्यावतीने देशभर आदरांजली वाहण्यात आली आहे. दक्षिण गोव्यातही काँग्रेसच्यावतीने आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. राज्यातून काश्मीरला गेलेले ५० पर्यटक सुरक्षित आहेत, हे महत्त्वाचे आहे. दहशतवाद्यांनी ज्याप्रकारे पर्यटकांवर गोळ्या झाडल्या त्या कृत्याचा निषेध कराल तेवढा कमी आहे, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, महिला प्रदेश अध्यक्ष प्रतीक्षा खलप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनापासून शुक्रवारी सायंकाळी मेणबत्ती फेरी काढण्यात आली.

या फेरीत अमरनाथ पणजीकर, वीरेंद्र शिरोडकर, प्रणव परब व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सर्व कार्यकर्त्यांनी दंडावर काळ्या पट्ट्या लावल्या होत्या. मृत्यू पावलेल्यांना काँग्रेस नेत्यांनी आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाजवळ आदरांजली वाहिली. दरम्यान, पाटकर म्हणाले, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयला पाठिंबा राहील, असे जाहीर केले आहे.

काँग्रेस पक्ष राज्यभर मृतांना आदरांजली वाहत आहे. गोव्यातही सुरक्षितता राहिलेली नाही; कारण प्रख्यात उद्योजकाच्या घरावर दरोडा पडत आहे. याप्रसंगी पणजीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

पोलिस मुख्यालय, उच्च न्यायालय उडविण्याच्या ज्या धमक्या दिल्या गेल्या आहेत, त्या सरकारने गंभीरपणे घ्याव्यात, आपण गोव्यातही सुरक्षित नाही हे लक्षात घ्यावे. काश्मीरमध्ये केंद्र सरकारने पर्यटक असलेल्या ठिकाणी सुरक्षितता वाढविणे गरजेचे आहे. पहलगाम हल्ल्यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्यातून केंद्र सरकारने मार्ग काढणे आवश्यक आहे.
अमित पाटकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT