Goa Congress: वास्को मुंडवेल येथील ' ई- झोन' स्नुकर गेमच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित माजी नगराध्यक्ष नंदी नंदादीप राऊत, नजीर खान, तनवीर सौदागर व इतर

 

Dainik Gomantak 

गोवा

काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा गोव्यात 'सत्ता' स्थापन करण्याच्या प्रयत्नात!

यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने सर्व मतदारसंघात जाऊन उमेदवाराची चाणी सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: अखिल भारतीय काँग्रेस पक्ष (Goa Congress) पुन्हा एकदा गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने सर्व मतदारसंघात जाऊन उमेदवाराची चाणी सुरू केली आहे. वास्कोत कॉंग्रेस उमेदवारी प्रक्ष श्रेष्ठी ज्याला कोणाला उमेदवारी देणार तो तेथे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असल्याची माहिती मोरगावचे माजी नगराध्यक्ष तथा वास्कोचे युवा काँग्रेस नेते नंदादीप राऊत यांनी दिली.

वास्को (Vasco) मुंडवेल येथील ' ई- झोन' स्नूकर गेम सायबर, स्टेशनरी दुकानाच्या उद्घाटन मुरगावचे माजी नगराध्यक्ष तथा वास्को काँग्रेस (Congress) युवा नेते नंदादीप राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत गोवा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान, दुकानाचे मालक तनवीर सौदागर, तुषार नाईक, शाहिद शेख, साजिद खान, तुषार नाईक, राजू नाईक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना नंदादीप राऊत म्हणाले की केंद्रात काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करून सुसज्ज असे प्रशासन देणार आहे. भाजप सरकारने सर्व क्षेत्रातील जनतेला आर्थिक रित्या कुमकुवत करून ठेवले आहे.

देशातील जनता महागाईने ग्रासलेली असल्याने जनतेसमोर एकच पर्याय राहिला आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष, अशी माहिती राऊत यांनी दिली.

गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) काँग्रेस पक्ष बहुमताने निवडून येणार आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीने सर्व मतदार संघातील काँग्रेस उमेदवार निवडण्याची चाचणी सुरू आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत यंदा वास्कोत काँग्रेसचा उमेदवार बहुमताने निवडून येणार असल्याची माहिती नंदादीप राऊत यांनी दिली. गोवा काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष नजीर खान यांनी सांगितले की राज्यात यंदाचे सरकार काँग्रेस पक्ष स्थापन करणार आहे. कारण गोव्यातील जनता भाजप सरकारवर नाराज असून यांचे सूर येणाऱ्या विधानसभेत भाजप पक्षाला जनता दाखवणार असल्याची माहिती खान यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT