गोव्यात नव वर्षाच्या स्वागतानंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पॉझिटीव्हीटी रेट 10.7% पर्यंत !

गोव्यात नवीन वर्षाच्या उत्सवानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून पॉझिटीव्ही रेट देखील 10.7% पर्यंत गेला आहे.
Corona

Corona

Dainik Gomantak

Published on
Updated on

देशभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार वाढू लागल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यातच गोव्यात सोमवारी 388 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर पॉझिटीव्हीटी रेट 10.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या गोव्यात (Goa) 1,671 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यापासून ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात (Goa Tourist) आले आहेत.

ख्रिसमस सण ते नववर्ष साजरे या कालावधीत गोव्यात आलेल्या मोठ्या संख्येने आलेले पर्यटक हे राज्यातील कोरोना संसर्गाचे (Corona) प्रमाण 10 टक्क्यांच्या पुढे जाण्यास कारणीभूत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, 3,604 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, त्यापैकी 388 नमुन्यांमध्ये रविवारी संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. या नवीन रुग्णांच्या वाढीने राज्यातील एकूण बाधितांची संख्या एक लाख 81 हजार 570 झाली आहे.

शिवाय, अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या 24 तासांत या आजारामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला असून, राज्यातील कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3523 झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

42 Percent Cooperative Societies Closed
PM Matsya Sampada Yojana Goa
NEP Implementation In Goa
Yuri Alemao Opposition Criticism
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com