GPCC President Amit Patkar, General Secretary Capt Viriato Fernandes Press conference Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गोव्यात सोन्याची तस्करी; सरकारमधील मंत्र्यांचा सहभाग : अमित पाटकर

दैनिक गोमन्तक

Goa Congress Allegation On BJP Government: ‘गोव्यात गेली काही वर्षे सोन्याच्या बिस्किटांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. भाजप सरकारातील एक मंत्री आणि त्याचे नातेवाईक या तस्करीत सामील आहेत, असा गंभीर आरोप गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी गुरुवारी केला.

राज्यात सर्रास एका मंत्र्याच्या कृपाआशीर्वादाने सोन्याच्या बिस्किटांची तस्करी होत असल्याचा दावा ‘जीपीसीसी’चे अध्यक्ष अमित पाटकर यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

पाटकर यांनी यावेळी नमूद केले की ‘जीपीसीसी’च्या सदस्यांनी महसूल गुप्तचर यंत्रणेच्या संचालकांकडे याविषयी तक्रार नोंद केली असून, पुरावेही दिले आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयात लक्ष घालून कडक कारवाई करण्याची गरज आहे. त्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली.

पाटकर म्हणाले, गोव्यातील मंत्र्यांच्या वैयक्तिक कर्मचार्‍यांनी ही तस्करी दुबई आणि परतीच्या साध्या सुट्टीच्या सहलींसारखे भासवले असले तरी, प्रत्यक्षात या सहली कोट्यावधी रुपयांच्या तस्करीच्या मोहिमेचा मोर्चा होत्या.

ज्यामध्ये कर चुकवून सोन्याची तस्करी केली जाते. त्यामुळे राष्ट्रीय तिजोरीचे मोठे नुकसान होत आहे. या रॅकेटमध्ये कायदा व्यवस्थेतील काही सदस्यांचाही समावेश असल्याचा संशय येत आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी आणि तपासणी होणे गरजेचे असल्याचे, पाटकर यावेळी म्हणाले.

कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सीचा वापर गुन्ह्याशी संबंधित काही लोकांना धमक्या आणि जबरदस्तीने शांत करण्यासाठी केला जात आहे. त्यांना राज्य आणि देश सोडण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा पाटकर यांनी यावेळी केला.

विरीआटो फर्नांडिस म्हणाले, सावंत सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याच्या नियंत्रणाखाली छुपे राष्ट्रविरोधी रॅकेट उघड करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रालयाचे खातेही आहे.

त्यांना गुप्तचर यंत्रणांनी पुरेशी माहिती दिली आहे. त्यांना या प्रकरणाची पूर्ण जाणीव आहे अशी खात्री काँग्रेसला आहे असे फर्नांडिस म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT