Goa Congress MLA
Goa Congress MLA Dainik Gomantak
गोवा

गोव्यात काँग्रेस अजूनही संभ्रमावस्थेत

दैनिक गोमन्तक

पणजी : माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो हे काँग्रेस पक्ष सोडून गेल्यात जमा आहेत. मात्र, अशा परिस्थितीतदेखील काँग्रेसला निर्णय घेता येत नसल्याची अवस्था सोमवारी रात्री उशिरा झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर दिसून आली. यामुळे काँग्रेस संभ्रमावस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.

पक्षश्रेष्ठींनी पाठवलेले दूत मुकूल वासनिक यांनी विधानसभा कामकाजानंतर पक्षाच्या आमदारांशी एकत्र आणि वन टू वन चर्चा केली. ही चर्चा फलदायी झाल्याचे सांगत वासनिक यांनी याबाबतचा संपूर्ण आपण हायकमांडकडे सादर करणार असून तेच अंतिम निर्णय घेतील असे सांगितले.

वासनिक म्हणाले, ‘आज आमदारांसोबत झालेली बैठक चांगल्या वातावरणात पार पडली. देशात काही पक्ष काँग्रेस संपवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. गोव्यातल्या आमदारांनी या नेत्यांच्या दबावाला बळी न पडता काँग्रेससोबत एकनिष्ठ राहणे पसंत केले. याविषयी आपण आपला अहवाल दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे सादर करणार आहोत. तेच अंतिम निर्णय घेतील.’ आज संध्याकाळी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचे कामकाज संपल्यानंतर काँग्रेस मुख्यालयात आमदारांना एकत्रित करण्यात आले. गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह या आमदारांची बैठक झाली. बैठकीला दिगंबर कामत अनुपस्थित होते. तर रविवारी बंडखोरीच्या पवित्र्यात असलेले मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई देखील उपस्थित होते. हे सर्व जण पक्षाच्या बैठकीत हजर झाल्याने त्यांचे बंड शमल्यात जमा आहे. अर्थात सकाळपासूनच त्यांचा आपण काँग्रेसमध्येच असल्याचा दावा होता.

दरम्यान, अधिवेशनात काँग्रेसच्या कथित बंडाळीनंतर नक्की काय होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, अधिवेशनाचे कामकाज सुरळित पार पडले. काँग्रेसच्या सर्वच सदस्यांनी विरोधकांची भूमिका ठामपणे माडंली.

लोबो, कामतांविरोधात अपात्रता याचिका

अधिवेशन सुरू होण्याला अवघा काही वेळ असताना काँग्रेसचे सर्व आमदार विधानसभेत दाखल झाले. आणि त्यांनी काँग्रेससोबतच आहोत ही निष्ठा माध्यमांसमोर बोलून दाखविली. त्यामुळे रात्रीच्या बंडाचे काय झाले हा प्रश्‍न सर्वांनाच पडला. नेमके याच वेळी प्रदेशाध्यक्ष पाटकर विधानसभेत दाखल होत विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्या विरोधात सभापती रमेश तवडकर यांच्याकडे अपात्रता याचिका दाखल करत आसनव्यवस्था बदलण्याची मागणी केली.

मी काँग्रेस कार्यकर्ता असून पक्षासोबतच आहे. आम्ही पाच वर्षांसाठी निवडलो गेलो आहोत. मात्र, मला विरोधी पक्षनेतेपदात स्वारस्य नाही. मी एखाद्या बैठकीला हजर राहिलो नाही याचा अर्थ माझ्यावरती अपात्रता याचिका दाखल करणे होत नाही. माझ्या सर्व शंका आमचे नेते मुकूल वासनिक यांनी दूर केल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मायकल लोबो यांनी दिली आहे. तर पक्षाच्या निर्णयाने आणि भूमिकेनी मी दुखावलो गेलो आहे. मात्र, मी अद्यापही काँग्रेसमध्येच आहे. रविवारी दिनेश गुंडूराव माझ्याविषयी जे बोलले ते ऐकून धक्का बसला. मी कधीही पक्षविरोधी कारवाया केल्‍या नाहीत. माझ्‍या नेतृत्‍वाखाली विधानसभा निवडणूक लढविली गेली. मात्र निवडणूक होताच मला हेतुपुरस्‍सर बाजूला करण्‍यात आले. क्रिकेटमधील ‘रिटायर्ड हर्ट’प्रमाणे माझी अवस्‍था आहे, असं दिगंबर कामत यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT