Michael Lobo | Congress vs BJP
Michael Lobo | Congress vs BJPDainik Gomantak

'काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलोय; अजूनही काँग्रेससोबतच'

सरकारमधील मंत्र्यांकडून गंभीर स्वरुपाचे आरोप केले जात असून कारवाईही केली जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी राहणं कठीण असल्याचं पक्षनेतृत्त्वाला कळवल्याचंही लोबोंनी स्पष्ट केलं.

पणजी : आपण काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलो असून अजूनही काँग्रेससोबतच असल्याचा दावा लोबो यांनी केला आहे. मात्र काँग्रेसकडून बैठकांवर बैठका घेतल्या जात असून आपल्याला पदावरुन दूर केल्याचंही मायकल लोबोंनी स्पष्ट केलं आहे. तसंच सरकारमधील मंत्र्यांकडून आपल्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले जात असून आपल्यावर कारवाईही केली जात आहे. अशा परिस्थितीत आपण विरोधी पक्षनेतेपदी राहणं कठीण असल्याचं पक्षनेतृत्त्वाला कळवल्याचंही लोबोंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते पदावरून मायकल लोबो यांची काँग्रेस पक्षाने हकालपट्टी केली आहे. त्यासंबंधीचे पत्र आता आपण सभापती रमेश तवडकर यांना सादर केले आहे. दुपारपर्यंत नवा विरोधी पक्षनेता निवडला जाईल आणि ती माहितीही सभापतींना सादर केली जाईल, असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिलं आहे.

Michael Lobo | Congress vs BJP
Digambar Kamat : 'रिटायर्ड हर्ट असलो तरी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच येत नाही'

दुसरीकडे मी काँग्रेसमध्येच मी रिटायर्ड हर्ट असलो तरी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच येत नाही पाठीमागच्या विधानसभेवेळी मी एकटा आमदार उरलो होतो. त्यामुळे पार्टी सोडण्याचा विषय येत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी दिली आहे.

मी दिनेश गुंडू राव (काँग्रेस गोवा प्रभारी) यांच्या प्रेसचा व्हिडिओ पाहिला जो प्रसारित केला जात आहे. मला धक्का बसला आहे आणि स्तब्ध आहे; मी शब्दांच्या पलीकडे दुखावलो गेलो आहे. दिनेश राव शनिवारी रात्री माझ्या घरी होते, तेव्हा मी त्यांना माझी स्थिती सांगितली. निवडणुकीनंतर माझ्यावर केलेल्या अपमानामुळे माझे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत, मलाही खूप दु:ख झाले आहे. त्यामुळे सध्या तरी मी कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही, असे मी म्हणालो. मी तंदुरुस्त झाल्यावर पाहू. 2017 पासून माझ्या भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असा दावा दिगंबर कामत यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com