Amit Patkar News | Goa Government News Dainik Gomantak
गोवा

गोवा प्रदेश काँग्रेसमध्ये नेतृत्वाची वानवा

प्रदेशाध्यक्षांना फार मोठा अुनभव नसल्‍याने त्‍यांना पक्षावर पकड ठेवणे अद्याप जमलेले नाही. यामुळे गोवा काँग्रेसमध्ये दमदार आणि कणखर नेतृत्वाची वानवा असल्याचे दिसून येते.

दैनिक गोमन्तक

पणजी : काँग्रेसमध्ये दिगंबर कामत हे ज्‍येष्ठ नेते असूनही ते सत्ताधारी भाजपविरुद्ध फारसे बोलताना दिसले नाहीत. तर मायकल यांच्‍यामागे भाजपाने शुक्‍लकाष्ट लावल्‍याने तेही विरोधी पक्षनेते तसे गप्पच होते. हे दोघे मात्तबर सोडल्‍यास काँग्रेसचे इतर आमदार तसे नवखेच आहेत. शिवाय प्रदेशाध्यक्षांनाही फार मोठा अुनभव नसल्‍याने त्‍यांनाही पक्षावर पकड ठेवणे अद्याप जमलेले नाही. यामुळे गोवा काँग्रेसमध्ये दमदार आणि कणखर नेतृत्वाची वाणवा असल्याचे दिसून येते.

राज्यातील काँग्रेसच्या आजच्या स्थितीला कोण जबाबदार याचा विचार केला तर त्यास केंद्रातील नेतृत्वही तितकेच जबाबदार असल्याचे स्पष्ट होते कारण गोव्‍यात काहीही राजकीय उलथापालथ झाली की, केवळ राजकीय निरीक्षक पाठवला जातो. किंवा प्रभारींना पाचारण केले जाते. पण पक्षातील नेत्‍यांना रोखण्याचे किंवा त्‍यांना समजावून सांगण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून होत नाही. राष्ट्रीय नेतृत्व निरीक्षक किंवा प्रभारींकडून येणाऱ्या अहवालावरून निर्णय घेते. बहुतांशवेळा प्रादेशिक नेतृत्वावरच विसंबून राहिल्‍याने पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व आणि प्रादेशिक नेत्‍यांमध्ये एक प्रकारचे अंतर राहिले आहे. हे अंतर कमी करण्याचे काम ना वरिष्ठ पातळीवरून केले जाते. ना प्रादेशिक पातळीवर होते. कारण विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे कामत किंवा लोबो या नेत्‍यांपुढे नवखे आहेत.

2017 मध्ये काँग्रेसने 17 जागांवर विजय मिळवला होता तर सत्ताधारी भाजपाने केवळ 13 जागांवर समाधान मानावे लागले होते. तरीही नेतानिवडीचा घोळ घालत बसलेल्‍या काँग्रेसला बगल देऊन गोवा फॉरवर्ड, मगो आणि अपक्षांच्‍या सहकार्याने भाजपाने सत्ता खेचून घेतली. त्‍यानंतर गोवा काँग्रेसमध्ये नेतृत्त्वावरून पक्षात कुरबुरी सुरू झाल्‍या. तत्‍कालिन गिरीश चोडणकर आणि दिगंबर कामत यांनी आपल्‍या परीने पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्‍न केला. पण तो तोकडा पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT