गोव्यात काँग्रेसच्या मागे लागले ‘शुक्लकाष्ठ’

गुंडू राव यांची कबुली : सहा आमदार आमच्यासमवेत, इतरांवर होऊ शकते कारवाई
Goa Congress MLA
Goa Congress MLADainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : दिवसभराच्या व्यस्त आणि जोरदार राजकीय घडामोडीनंतर कॉंग्रेस फुटल्याची स्पष्ट कबुली पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी रात्री उशिरा दिली. यामुळेच त्यांना पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या पक्षविरोधी कारवायांबाबत निलंबनाची कारवाई करीत असल्याचे सांगत आता कायदेशीर कारवाईचेही संकेत गुंडू राव यांनी दिले.

गुंडूराव म्हणाले, ‘‘कॉंग्रेसमधील आमदारांना फोडून विरोधी गटात सामील करण्यासाठी लोबो आणि कामत गेल्या काही दिवसांपासून कार्यरत असल्याचे बोलले जात होते. याचे प्रत्यक्ष अनुभव कालपासून आम्हाला येत होता. कामत आणि लोबो पक्षातील आमदारांच्या संपर्कात राहून त्यांना भाजपमध्ये त्यांच्या समवेत येण्यासाठी प्रयत्न करीत होते. पक्षांतरबंदी कायद्यानुसार, पक्षातून बाहेर पडण्यासाठी दोन तृतीयांश आमदारांची गरज असते हे ओळखून त्यांनी बहुतांश आमदारांशी संपर्क केल्याचे पुरावे आमच्याकडे आल्याने पक्षविरोधी कारवाई केल्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.’’

गुंडू राव यांनी सांगितले, ‘‘देशभर भाजप कॉंग्रेस संपविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांना विरोधी पक्ष नको आहे. यासाठीच ते पैसा, सत्ता आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून कॉंग्रेस लोकप्रतिनिधींना त्रास देऊन आपल्याकडे वळवत आहेत. हा सत्तेचा गैरवापर असून, लोकशाहीविरोधी कृती आहे. मात्र, कॉंग्रेस लोकभावनेचा आदर करून विरोधी पक्षाचे काम करतच राहणार आहे.’’

Goa Congress MLA
पणजीत जुन्या गोमेकॉसमोर फूड ट्रक झोन

‘गोमन्तक’ने दिले होते संकेत

कॉंग्रेस फुटीचे वृत्त यापूर्वीच दै. ‘गोमन्तक’ला मिळाले होते. त्यानुसार शनिवारी (ता. ९) ‘कॉंग्रेस खिंडार’ या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. ‘गोमन्तक’ने राजकीय पटलावरील बदलाच्या संकेताबाबत इत्यंभूत माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चा होती. आता कॉंग्रेसचे मोठ्या प्रमाणात आमदार फुटल्याने या पक्षाच्या भवितव्याविषयी कार्यकर्त्यांना चिंता लागून राहिली आहे.

‘कॉंग्रेस’समवेत सहा आमदार

विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून अकरा आमदार निवडून आले होते. चार महिन्यांतच यापैकी काही आमदार फुटल्याची कबुली प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी दिली. सध्या रुदाल्फ फर्नांडिस, एल्टन डिकॉस्टा, युरी आलेमाव, कार्लुस परैरा, संकल्प आमोणकर व आलेक्स सिक्वेरा हे आमदार कॉंग्रेससोबत सध्यातरी आहेत. तर कॉंग्रेसकडून निवडून आलेले मायकल लोबो, दिगंबर कामत, राजेश फळदेसाई, दिलायला लोबो व केदार नाईक हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, याबाबतचे सोपस्कर अजून पूर्ण झालेले नाहीत. या संधीचा फायदा उठवत गुंडू राव यांनी फळदेसाई, केदार नाईक आणि दिलायला लोबो यांना परत पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, कितीसा प्रतिसाद मिळतो, हे काही काळातच कळेल.

कॉंग्रेस फुटीर आमदारांमुळे आजचा दिवस बऱ्याच घडामोडीचा ठरला. कॉंग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव गोव्यात दाखल होताच त्यांनी बैठकांचा सपाटा लावला. फुटीर आमदार परत पक्षात येण्यास राजी नसल्याचे व आता यातून काहीच निष्फळ न झाल्याने गुंडूराव हतबल ठरले. त्यातच विरोधी पक्षनेता लोबो यांनी खुद्द मुख्यमंत्री सावंत यांचा बंगलाच गाठल्याने कॉंग्रेसच्या कार्यालयातच प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना कपाळावर ‘हात’ मारून घेण्याची वेळ आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com