KC Venugopal Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: युतीच्या गोष्टी केवळ वाऱ्यावर, वेणुगोपाल यांच्या बैठकीत 'गोवा राखण यात्रे'वरच चर्चा

KC Venugopal Goa latest news: अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी बाणावली येथे काँग्रेस पक्षाच्या गाभा समितीच्या बैठकीत यासंदर्भात एक शब्दही काढला नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: गोवा राखण यात्रेच्या निमित्ताने गोव्यात आलेले अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस महायुतीस तयार असल्याचे भाष्य केले असले तरी काल बाणावली येथे काँग्रेस पक्षाच्या गाभा समितीच्या बैठकीत यासंदर्भात एक शब्दही काढला नाही.

काल बाणावली येथील हॉटेल ताज एक्झॉटिका येथे ही बैठक झाली. गोव्यात सर्व विरोधी पक्षांनी एकत्रितरित्या भाजपविरोधात लढा द्यावा, अशी लोकांमध्ये तीव्र भावना आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर वेणुगोपाल हे यासंबंधी चर्चा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, या बैठकीत ‘आरजी’व्यतिरिक्त अन्य कुठल्याही पक्षांकडे युती करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.

काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधला असता, महायुतीबाबत या बैठकीत कसलीही चर्चा झाली नाही, असे सांगितले. या बैठकीत गोवा राखण यात्रा पुढे कशी न्यावी आणि लोकांपर्यंत कसे पोहोचावे आणि पुढील वाटचाल कशी करावी, यावरच प्रामुख्याने चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला गिरीश चोडणकर यांच्याव्यतिरिक्त विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्यकारी अध्यक्ष सुनील कवठणकर, खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, आमदार कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा आणि अन्य महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, महायुतीबाबत काँग्रेस पक्षाने आपली धोरणे स्पष्ट करण्याची गरज आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आपला पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करण्याची तयारी दाखवली होती तर ते होण्यापासून काँग्रेसला कुणी रोखले, याबाबतही वेणुगोपाळ यांनी लोकांना सांगितले पाहिजे, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी यापूर्वी म्हटले होते.

संघटनात्मक बांधणीवर देणार भर : युरी

गोव्यात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात निवडणूक लढवावी ही भावना लक्षात घेऊन आम्ही आमची पूर्वीची भूमिका बदलण्यास तयार आहोत, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटल्यावर विरोधी पक्ष जर भाजपला हरविण्यासाठी गंभीर आहेत तर काँग्रेस या महायुतीस तयार आहे, असे वेणुगोपाल यांनी म्हटले होते. त्यामुळे याबाबत चर्चा होणार, अशी अपेक्षा होती.

बैठकीदरम्यान नेत्यांनी गोव्यातील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर आणि सद्य राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. गोव्यात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करणे आणि आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी रणनीती आखणे यावर या बैठकीत भर देण्यात आला, अशी माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: 'खाओ पीओ' काँग्रेस बैठक

Goa Cricket Association: प्रशांत काकोडेंचे 'आयसीए' सदस्यत्व निलंबित, जीसीए नैतिक अधिकारी-लोकपालाकडून कारवाई

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना दुर्गापूजेचं बंपर गिफ्ट! महागाई भत्त्यात होणार घसघशीत वाढ; पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

SCROLL FOR NEXT