Goa Cricket Association: प्रशांत काकोडेंचे 'आयसीए' सदस्यत्व निलंबित, जीसीए नैतिक अधिकारी-लोकपालाकडून कारवाई

Goa Cricket Association Prashant Kakode Suspended: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) व्यवस्थापकीय समितीत इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनतर्फे (आयसीए) सदस्य प्रशांत काकोडे यांना ‘हितसंबंधांचा संघर्ष’ प्रकरणी जीसीए नैतिक अधिकारी-लोकपाल यांनी तात्काळ निलंबित केले आहे.
Goa Cricket Association
Goa Cricket AssociationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) व्यवस्थापकीय समितीत इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनतर्फे (आयसीए) सदस्य प्रशांत काकोडे यांना ‘हितसंबंधांचा संघर्ष’ प्रकरणी जीसीए नैतिक अधिकारी-लोकपाल यांनी तात्काळ निलंबित केले आहे. त्यांचा मुलगा मनीष काकोडे जीसीएचा सक्रिय खेळाडू असतानाही, त्यांनी आपल्या पदाचा वापर आणि माहितीबाबत आवश्यक प्रतिज्ञापत्र न दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

गोव्याचे माजी क्रिकेटपटू सुदिन कामत यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. बीसीसीआयच्या नियमावलीतील कलम ३८च्या उल्लंघनाचा आरोप त्यांनी केला होता. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पदभार स्वीकारल्यानंतर १५ दिवसांच्या आत प्रशांत काकोडे यांनी आपल्या मुलाच्या क्रिकेट सदस्यत्वाबाबतचे लिखित प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक होते. मात्र, त्यांनी हे कलम ३८(२) नुसार सादर केले नाही, ज्यामुळे नियमांचे उल्लंघन झाले आहे.

मुलाच्या खेळण्याच्या अधिकारांवर आणि असोसिएशनच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडू शकेल अशा पदावर ते कार्यरत होते. हा संघर्ष केवळ बैठकीतून बाहेर राहून किंवा अंशतः बाजूला होऊन सुटणारा नाही, त्यामुळे कलम ३८(३)(ब) नुसार हा ''असाध्य संघर्ष'' ठरवण्यात आला. नियमावलीतील कलम ३९(३)(ब)(आय) नुसार प्रशांत काकोडे यांना व्यवस्थापन समितीच्या सर्व कामांतून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

Goa Cricket Association
Goa Politics: 'मत चोरी'द्वारे जिंकण्याचा डाव, 1.27 लाख मतदार वगळले; सरदेसाईंचा भाजपवर आरोप

त्यामुळे त्यांना आता जीसीएच्या कोणत्याही बैठकीत किंवा निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. गतवर्षी झालेल्या आयसीए निवडणुकीत गोवा विभागात काकोडे यांनी सुदिन यांचा पराभव केला होता.

गोवा क्रिकेट संघटनेला निर्देश

जीसीएने प्रशांत काकोडे यांच्या सहभागावर तात्काळ बंदी घालावी असे निर्देश दिले आहेत. तसेच या आदेशाची प्रत ७ दिवसांच्या आत इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनला पाठवून नवीन नामनिर्देशन मागावे आणि जीसीए सचिवांनी सर्व अधिकारी व सदस्यांना १५ दिवसांच्या आत हितसंबंधांचे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश द्यावे असेही आदेशात नमूद केले आहे.

Goa Cricket Association
Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

मनीषला दिलासा

तक्रारदाराने खेळाडू मनीष काकोडे याला संघातून वगळण्याची केलेली मागणी नैतिक अधिकारी-लोकपाल अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. मनीषच्या निवडीवर, गुणवत्तेवर किंवा त्याच्या कारकिर्दीवर याचा कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, तसेच त्याच्या खेळाच्या संधींवर कोणतीही बंधने आणली जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com