Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

Goa Dam Water Level: राज्यातील बहुतांश धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. साळावली आणि आमठाणे धरणांनी शंभर टक्के पातळी गाठली असून, अंजुणे, पंचवाडी आणि गांजे धरणांमध्येही ९७ ते ९८ टक्के जलसाठा आहे.
Goa Water Storage
Goa Water StorageDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

चावडी: राज्यातील बहुतांश धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. साळावली आणि आमठाणे धरणांनी शंभर टक्के पातळी गाठली असून, अंजुणे, पंचवाडी आणि गांजे धरणांमध्येही ९७ ते ९८ टक्के जलसाठा आहे. तिळारीत ९१ टक्के पाणीसाठा आहे. काणकोणच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या चापोली धरणातही ७४ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने दिलासा मिळाला आहे.

काणकोण नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा चापोली जलाशयातून केला जातो. त्याचबरोबर श्रीस्थळ पंचायत परिसरातील शेतकरीही शेतीसाठी या जलाशयावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.

वायंगणी भातशेतीसह मिरची, भाजीपाला आणि अन्य पिकांसाठी चापोलीच्या पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे धरणातील जलसाठा काणकोणच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही महत्त्वाचा ठरतो. गेल्या वर्षी दमदार पावसामुळे ऑगस्टमध्येच चापोली धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.

Goa Water Storage
Goa Politics: 'मत चोरी'द्वारे जिंकण्याचा डाव, 1.27 लाख मतदार वगळले; सरदेसाईंचा भाजपवर आरोप

गाळ काढल्यास वाढणार साठवण क्षमता

चापोली जलाशयात साचलेला गाळ काढल्यास धरणाची प्रत्यक्ष पाणी साठवण क्षमता आणखी वाढू शकते. यासंदर्भात, सामाजिक कार्यकर्ते शुभम कोमरपंत यांनी जलसंपदा विभागाचे काणकोण येथील सहाय्यक अभियंता धनंजय नागवेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

धरणातील गाळ काढण्याचे काम वेळेत हाती घेतल्यास अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होऊन भविष्यातील पाणीपुरवठ्याला अधिक सुरक्षितता मिळू शकते, असे त्यांनी निवेदनातून स्पष्ट केले. सहाय्यक अभियंता धनंजय नागवेकर यांनी या मागणीची दखल घेत चापोली धरणातील गाळ काढण्याचा विषय सरकारसमोर मांडून आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

Goa Water Storage
Goa Shack Policy: शॅक्‍स धोरणाला एका हंगामाची मुदतवाढ, नियमभंग केल्‍यास लाखोंचा दंड; सीसीटीव्ही बंधनकारक

दररोज २.५ हेक्टोमीटर पाणी

चापोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३८.७४ हेक्टोमीटर असून धरणाची लांबी ७६० मीटर आहे. धरणातून दररोज सुमारे २.५ हेक्टोमीटर पाणी श्रीस्थळ येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे पाठविले जाते. जलशुद्धीकरणानंतर या पाण्याचा वापर काणकोण तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी केला जातो. पावसाचे बदलते स्वरूप आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांची क्षमता वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com