Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोवा फॉरवर्डसोबत युतीच्या चर्चेला दिल्‍लीत सकारात्मक वळण, काँग्रेसचा सावध आशावाद; पुढील बैठक निर्णायक

Goa Congress Goa Forward Alliance Talks: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने गोवा फॉरवर्डसोबत सावधपणे युतीची चर्चा करण्‍यावर भर दिला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने गोवा फॉरवर्डसोबत सावधपणे युतीची चर्चा करण्‍यावर भर दिला आहे. मंगळवारी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत युतीच्या चर्चेची सुरुवात चांगली झाली असल्याचे गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.

तथापि, २०१७ मध्‍ये मनोहर पर्रीकरांना पाठिंबा देण्‍याच्‍या ‘फॉरवर्ड’ भूमिकेमुळे संभाव्य युतीविषयी काँग्रेसने सावध आशावाद बाळगला आहे. अर्थात, अलीकडच्या काळात काँग्रेस - गोवा फॉरवर्डमध्‍ये एकमेकांप्रति वाढलेला विश्वास ही उभय पक्षांसाठी जमेची बाजू ठरणार आहे. त्यामुळे प्रारंभीच्या सकारात्मक बोलणीनंतर पुढच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करण्यावर भर असेल, असे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे.

सकारात्मक सुरुवात : ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्याच्या जनतेचा ‘मूड’ भाजपला सत्तेतून बाहेर करण्याचा असून, त्यासाठी सर्व समविचारी व भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने गोवा फॉरवर्ड व रिव्हॉल्युशनरी गोवन्‍स पक्षासोबत युतीची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India First Flex Hybrid Car: भारतातील पहिली फ्लेक्स-हायब्रिड कार लॉन्च! E20 ते E85 इंधनावर धावणार टोयोटाची नवी Innova HyCross, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या

ST Political Reservation: 'आरक्षणाची शेवटची आशाही मावळली'; प्रकाश वेळीप यांची खंत, अन्यायाविरोधात लोकच निर्णय घेणार

खरी कुजबुज: एका उमेदवारीवर दोघांचा दावा!

Vasco Mock Drill: वास्कोत अचानक अग्निशमन बंब, रुग्णवाहिकांची धावपळ; न्यू मॉडर्न मार्केटमध्ये मॉक ड्रिल

VIDEO: Clean Bowled... एकही चेंडू न खेळता फलंदाज क्लीन बोल्ड! क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, BBLमधील व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT