Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Flag Controversy: काँग्रेसच्या झेंड्यावरुन पणजीत नवा वाद! महापालिका कर्मचाऱ्यांनी काढलेले झेंडे डॉ. अंजली निंबाळकरांनी पुन्हा लावले

Goa Congress Flags Removed: राज्यात काँग्रेस मजबूतपणे आपले कार्य पुढे नेत आहे. काँग्रेस पक्षाची वाढती ताकद, एकता आणि बुलंद आवाजाची भाजपला आता भीती वाटू लागली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यात काँग्रेस मजबूतपणे आपले कार्य पुढे नेत आहे. काँग्रेस पक्षाची वाढती ताकद, एकता आणि बुलंद आवाजाची भाजपला आता भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच पक्षाच्या कार्यालयासमोरील झेंडे हटविले जात असल्याचा आरोप गोवा प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी केला.

त्याचबरोबर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढलेले झेंडे कार्यकर्त्यांच्या मदतीने निंबाळकर यांनी पुन्हा त्याच जागी लावले. सायंकाळी साडेसात-आठच्या सुमारास ही घटना घडली. काँग्रेस भवनाच्या समोरील रस्ता दुभाजकावर असलेल्या लोखंडी ग्रीलवर दोन दिवसांपासून पक्षाचे झेंडे अडकविण्यात आले आहेत.

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार सायंकाळी झेंडे काढले आणि गाडीत ते भरले. पक्ष कार्यालयात असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर, महेश म्हांबरे व ग्लेन काब्राल यांना ही बाब कळाली, त्यांनी तात्काळ खाली येत महानगरपालिकेची गाडी अडवली आणि त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना झेंडे देण्यास भाग पाडले.

निंबाळकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बरोबर घेत प्रत्येक झेंडा अभिमानाने पुन्हा योग्य जागी लावला. काँग्रेसचा झेंडा म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नव्हे, तर तो आमच्या विचारसरणीचे, लोकशाहीप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे आणि जनतेसाठी लढण्याच्या आमच्या अटळ निर्धाराचे प्रतीक असल्याचे निंबाळकर यांनी कर्मचाऱ्यांना सुनावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT