Kushavati District Six Assembly Seats Dainik Gomantak
गोवा

Kushavati District Six Assembly Seats: कुशावती मतदारसंघांच्या मुद्द्यावरून गोव्यात राजकीय वाद! 8 पैकी 6 जागा जिंकण्याच्या काँग्रेसच्या दाव्यावर गोवा फॉरवर्ड अन् भाजपचा जोरदार हल्ला

Goa Congress Kushavati district: भाजपचे समाजमाध्यम प्रभारी शुभम पार्सेकर यांनीही काँग्रेसच्या दाव्यावर टीका केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: काँग्रेसचे कुशावती जिल्हाध्यक्ष राजेश वेरेकर यांनी कुशावती जिल्ह्यातील आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघ जिंकण्याचा दावा केल्यानंतर त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे मुख्य प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी कुशावती जिल्ह्यात प्रत्यक्षात पाचच विधानसभा मतदारसंघ असताना सहा मतदारसंघ जिंकण्याचा दावा कसा केला, असा सवाल उपस्थित केला.

गोव्याचा इतिहास आणि भूगोल माहीत नसलेल्या व्यक्तीची काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे का, अशी टीकाही त्यांनी केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना राजेश वेरेकर यांनी महसुली कुशावती जिल्ह्यात पाच मतदारसंघ असल्याचे मान्य केले. मात्र, काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेनुसार कुशावती जिल्ह्यात शिरोडा, फोंडा आणि मडकई या मतदारसंघांचाही समावेश असल्याने एकूण आठ मतदारसंघांचा विचार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे समाजमाध्यम प्रभारी शुभम पार्सेकर यांनीही काँग्रेसच्या दाव्यावर टीका केली. त्याला उत्तर देताना युवा काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांनी काँग्रेसच्या संघटनात्मक विभागणीची माहिती न घेता भाजपने लोकांची दिशाभूल करू नये आणि सरकारच्या कारभाराकडे लक्ष द्यावे, असा पलटवार केला.

काँग्रेस आत्मविश्वासाने दावा करत आहे की, ते कुशावतीमधील ८ पैकी ६ जागा जिंकतील, तर कुशावतीमध्ये केवळ ५ विधानसभा जागा आहेत. त्यामुळे ते सहा जागा जिंकतील कसे? काँग्रेसने केलेला हा दुसरा सर्वात अवास्तव दावा आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी काँग्रेसने गोव्यात आपण २७ जागा जिंकणार, असा अवास्तव दावा केला होता.

- शुभम पार्सेकर, भाजप, सोशल मीडिया प्रभारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT