Geet Janmtana Workshop, in Margao, Goa. On 27 July, 2021. Manguesh Borkar / Dainik Gomantak
गोवा

Goa: 'गीत जन्मताना'ची चार दिवसीय कार्यशाळा संपन्न

गीत निर्मितीसाठी  एक दोन वादकांचा जरुर विचार करावा (Goa)

मंगेश बोरकर

फातोर्डा: एखादे गीत रसिकांना आवडावे किंवा ते गाणे त्यांच्या ओठावर सदैव रहावे  व ते प्रसिद्ध व्हावे यासाठी गीतकार (Lyricist), संगीत संयोजक(Music Arranger), संगीतकार व गायक (Musician & Singer) या सर्वांचे योगदान महत्वाचे असते असे एकमत, चार दिवसीय चाललेल्या 'गीत जन्मताना' कार्यशाळेच्या (Geet Janmatana Workshop) समारोप सोहळ्यात सर्वच तज्ञांनी व्यक्त केले, ही कार्यशाळा सम्राट क्लब मडगाव (Samrat Club Margao), अंतर्नाद क्रिएशन्स (Antrnaad Creation)व पलाश अग्नी स्टुडिओने (Palash Agni Studio) आयोजित केली होती.

या चार दिवसीय कार्यशाळेत डॉ, राजय पवार, साईश पाणंदीकर (गीतकार), यतिन तळावलीकर, दिलीप वझे (संगीतकार), विष्णू शिरोडकर, सिंधुराज कामत (संगीत संयोजक), डॉ. प्रविण गावकर, अक्षदा तळावलीकर (गायक), यानी भाग घेऊन गीत जन्मतानाचे अनेक बारकावे व अनुभवांचे कथन केले. प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की, कौशल इनामदार, तसेच संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर यांनीही या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

आधुनिक तंत्रज्ञानांमुळे गीत निर्मितीचे काम जरी सोपे झालेले असले तरी जास्त वादकांची गरज भासत नसल्याने कित्येक वादकांना उपजिविकेसाठी आटापिटा करावा लागते, याबद्दल चर्चेत चिंता व्यक्त करण्यात आली. प्रत्येक जण जरी व्यावसायिक नजरेने विचार करीत असला तरी कार्यक्रमाचे आयोजन करताना किंवा गीत निर्मितीसाठी एक दोन वादकांचा जरुर विचार करावा, अशी सुचना यावेळी करण्यात आली. गीत निर्मितीत काम करणाऱ्या सर्वानाच संगीतातील स्वर,राग, लय, ठेक्याचे ज्ञान असणे महत्वाचे असल्याचा सूरही या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. समारोप सोहळ्याच्या चर्चा सत्राचे सुत्रसंचालन प्रा. गोविंद भगत यांनी केले. तर समारोप सोहळ्याची सुरुवात अनिश अग्नी यांच्या निवेदनाने झाली. सम्राट क्लब मडगावचे अध्यक्ष पराग रायकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT