Goa: आर्वी स्पोर्ट्स आणि कल्चरल क्लबचे कार्य कौतुकास्पद

आर्वी स्पोर्ट्स आणि कल्चरल क्लब कोरगाव या संस्थेने आयोजित केलेल्या विजय कारगिल दिवसाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे या नात्याने आजगावकर बोलत होते.
The work of RV Sports and Cultural Club is admirable
The work of RV Sports and Cultural Club is admirableDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas ) म्हणजेच 26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस आहे. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. कारगिल युद्ध आणि त्यामध्ये भारतीय सैन्यानं (Indian Army) दाखवलेल्या शौर्यानं प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटतं. आर्वी स्पोर्ट्स आणि कल्चरल क्लबने (Cultural Club) या दिवसाचे औचित्य साधून अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. हे खरोखरच त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. या क्लबने (Club) क्रीडा क्षेत्रात अनेक पारितोषिके जिंकून गोव्यातच (Goa) नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांनी भविष्यात सामाजिक (Social) , सांस्कृतिक (Cultural) आणि क्रीडा (Sports) क्षेत्रात असेच भरीव कार्य करून पेडण्याचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी केले.

आर्वी स्पोर्ट्स आणि कल्चरल क्लब कोरगाव या संस्थेने आयोजित केलेल्या विजय कारगिल दिवसाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे या नात्याने आजगावकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खास निमंत्रित मांद्रे मतदारसंघाचे आमदार व गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे, हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, कोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच उमा साळगावकर, उपसरपंच समील भाटलेकर, पंच वसंत पेडणेकर, पंच प्रमिला देसाई, पंच उदय पालयेकर, पंच कुस्तान कुयेलो, पंच अब्दुल नाईक, कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुदन बर्वे, कमलेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन परशुराम गावडे, संस्थेचे अध्यक्ष विराज हरमलकर, विनोद हरमलकर, उल्हास देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे,परशुराम गावडे, प्रा. सुदन बर्वे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कोरगाव गावात तसेच पेडणे तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या अंशिका बर्डे, नम्रता साळगावकर, माधवी गावडे, रिद्धी गवंडी, श्रावणी कांबळी, धनश्री नाईक,साईश हरमलकर या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक जीवबा दळवी यांचाही यावेळी खास गौरव करण्यात आला. तसेच कोविड महामारीच्या काळात कोरगाव गावात योगदान दिलेल्या डॉ. नवनाथ केरकर, डॉ.पंढरी कोरगावकर, डॉ. पुंडलिक गवंडी यांचा 'कोविड योद्धा' म्हणून गौरव करण्यात आला. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने शहीद जवान तुकाराम गवस यांच्या वीरनारी लीलावती तुकाराम गवस, भारतीय नौसेनेत सेवा बजावलेले अनिल बोंद्रे, वीस वर्षे भारतीय सेनेत सेवा बजावलेले कोरेगावचे सुपुत्र रुपेश भाईडकर,कोरगावचे सुपुत्र व राष्ट्रीय कॅडेत कॉप्स मध्ये एन.सी.सी. अधिकारी असलेले अनिकेत केरकर यांचा यावेळी खास सत्कार करण्यात आला.

स्वागत व प्रास्ताविक कृष्णा पालयेकर यांनी केले. विनोद हरमलकर यांनी मान्यवरांचा परिचय केला.अनिकेत देसाई, गौरेश प्रभू,साईदीप नागवेकर,निखिल गडेकर, सिद्धेश कोरगावकर,महेश भाईडकर,सनम बंधारकर यांनी पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन ओंकार गोवेकर यांनी केले तर स्वप्नील कोरगावकर यांनी आभार मानले.

सत्कारमूर्तीसमवेत उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष व आमदार दयानंद सोपटे, हरमल जि. पं. सदस्य रंगनाथ कलशावकर, सरपंच उमा साळगावकर,क्लबचे अध्यक्ष विराज हरमलकर,विनोद हरमलकर व इतर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com