Covid vaccination Dainik Gomantak
गोवा

गोव्यात नागरिकांचे 72% लसीकरण पूर्ण: मुख्यमंत्री

हिमाचल प्रदेशने (Himachal Pradesh) हे यश मिळवल्यानंतर गेल्या महिन्यात पहिल्या कोविड डोसचे 100 टक्के कव्हरेज पूर्ण करणारे गोवा दुसरे राज्य होते.

दैनिक गोमन्तक

राज्यातील (Goa) कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. यातच आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी दुसऱ्या कोविड लसीकरणाच्या (Covid Vaccination) डोसचे जवळपास 72 टक्के कव्हरेज पूर्ण झाल्याचे मंगळवारी सांगितले.

दरम्यान, "दुसऱ्या डोसचे 72 टक्के काम राज्यात पूर्ण झाले आहे. आम्ही 30 ऑक्टोबरपर्यंत 100 टक्के कव्हरेजचे लक्ष्य ठेवले आहे," असही सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हिमाचल प्रदेशने (Himachal Pradesh) हे यश मिळवल्यानंतर गेल्या महिन्यात पहिल्या कोविड डोसचे 100 टक्के कव्हरेज पूर्ण करणारे गोवा दुसरे राज्य होते.

तसेच, देशाने लसीकरणात (Vaccination) एक मोठा टप्पा गाठला आहे. भारत देशात COVID- 19 लसीकरणाचा आकडा 100 कोटींच्या पुढे गेला आहे. यानिमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी ट्विट करून देशाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले, "भारताचे अभिनंदन! दूरदर्शी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाचा हा परिणाम आहे.(India became a 1billionaire in COVID-19 Vaccination)

शिवाय, भारताने आज सकाळी 9.48 वाजता 100 कोटी डोसचा आकडा पार करून जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 100 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.भारतातील सुमारे 75 टक्के प्रौढांना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे, तर 31 टक्के लोकसंख्येला दोन्ही मिळाले आहेत. त्याचबरोबर केंद्राने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 102 कोटींपेक्षा जास्त डोस दिले आहेत.

100 कोटी डोसचा ऐतिहासिक टप्प्पा साध्य केल्याबद्दल संपूर्ण देशभर उत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गत देशभरात कार्यक्रम विविध आयोजित करून ज्यांनी लसीकरणासाठी योगदान दिले त्यांना कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. देशात 100 कोटी डोस देण्याच्या निमित्ताने आरोग्यमंत्री मनसुख मांडविया लाल किल्ल्यावरून गायक कैलाश खेर यांचे गाणे देखील प्रदर्शित करणार आहेत.यासोबतच देशातील सर्वात मोठा खादी तिरंगा लाल किल्ल्यावर या ऐतिहासिक क्षणावेळी फडकवला जाईल. एवढेच नाही तर हा आंनदी क्षण सर्वांच्या लक्षात राहावा म्हणून विमान, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर याची घोषणा करण्यात येणार आहे.

Covid vaccination

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT