पर्यटक वाढल्याने कोरोनाची धास्ती

24 तासांत चौघांचा बळी : राज्‍यात नवीन 57 रुग्णांची नोंद
Goa Corona grew as number of tourists increased
Goa Corona grew as number of tourists increased Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात कोविडचे प्रमाण नियंत्रणात येत असल्याचे दिसत असतानाच गेले काही दिवस कोरोना रुग्ण मृत्यूची सरासरी 3 ते 4 झाली आहे. गेल्या चोवीस तासांत पुन्हा 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब होऊ शकते. नवे कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण आज आणखी खाली आहे ही जमेची बाजू आहे. गोव्यात गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची वर्दळ वाढल्याने कोरोना स्थितीवर नियंत्रण ठेवणे सरकारी यंत्रणेच्या आवाक्याबाहेर जात आहे.

Goa Corona grew as number of tourists increased
गोमेकॉ आरोपीच्या पिंजऱ्यात

गेल्या चार दिवसांत (15 ते 18 ऑक्टोबर) 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सक्रिय असलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही कमी (600) झाली आहे. नवे रुग्ण नोंद होण्याच्या प्रमाणापेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसांत वाढत आहे. 63 जण बरे झाले आहेत, त्यातील 57 जण गृह अलगीकरणातील, तर 6 जण इस्पितळातील आहेत. गेल्या चोवीस तासांत 3502 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी दीड टक्के (57) नवे रुग्ण सापडले. 11 जणांना इस्पितळात दाखल केले आहे, तर 42 जण गृह अलगीकरणात आहेत.

Goa Corona grew as number of tourists increased
ऑफलाईन' परीक्षा आली अंगलट;दहावीचा विद्यार्थी 'कोविड' पॉझिटिव्ह

राज्यातील नागरिकांना दोन्ही लसीकरणाचे डोस देण्याचे लक्ष्य येत्या ऑक्टोबरपर्यंत सरकारला पूर्ण करायचे आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण वाढत आहे, तर एक डोस घेणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे.

मृत्यूंच्या प्रमाणात वाढ

राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण 0 ते 2 इतके होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून ते वाढत आहे. हे कोरोना रुग्ण असले तरी त्यांना इतरही आजार असल्याने उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू होत आहे. मृत्यूचे प्रमाण 3350 वर गेले आहे. हे वाढत जाणारे प्रमाण पुन्हा एकदा डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com