NAAC Bengaluru Gomantak Digital Team
गोवा

NAAC : गोव्याच्या सर्व महाविद्यालयांना ‘नॅक’!

संचालक लोलयेकर : पर्वरीत कार्यशाळा उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : राज्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या संदर्भात लक्षणीय प्रगती केली आहे. आगामी काळात राज्यातील सर्व महाविद्यालये नॕक मानांकित होतील. ही सर्व महाविद्यालये नॕक मानांकित करणे हेच उच्च शिक्षण संचालनालयाचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी पर्वरीत केले.

उच्च शिक्षण संचालनालय (DHE) व राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC), बंगळुरू यांच्यातर्फे२४ मार्च रोजी ‘राज्यातील गैर-मूल्यांकन उच्च शिक्षण संस्थांसाठी मूल्यांकन आणि मान्यता प्रक्रिया’ याविषयावर आयोजित कार्यशाळेत लोलयेकर बोलत होते. ही कार्यशाळा पर्वरी येथील एससीईआरटी इमारतीतील परिषद सभागृहात पार पडली. यावेळी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC), बंगळुरूचे उपसल्लागार डाॕ. प्रशांत परहाड यांनी ज्येष्ठ तज्ञ्ज म्हणून मार्गदर्शन करत प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या विविध निकषांची माहिती दिली.

२६ महाविद्यालयांची नॅक प्रक्रिया पूर्ण

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ३९ पैकी २६ महाविद्यालयांनी नॕक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ‘गोवा राज्यातील गैर-मूल्यांकन उच्च शिक्षण संस्थांसाठी मूल्यांकन आणि मान्यता प्रक्रिया’ याविषयावरील कार्यशाळेत राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमधील ६४ प्राध्यापक व प्राचार्य यांनी सहभाग घेतला. उच्च शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक व कार्यशाळेचे मुख्य समन्वयक प्रा.(डॉ.) एफ.एम. नदाफ यांनी सूत्रसंचालन केले. साहाय्यक संचालक भक्ती नाईक यांनी आभार मानले.

संचालक म्हणाले की...

  • नॕकमुळे शिक्षणातील गुणवत्ता सुधारलेली आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे.

  • गोव्यातील महाविद्यालयांनी नॕकला सामोरे जाताना आपली गुणवत्ता अधोरेखित केलेलीआहे.

  • इंजिनियरिंग, मेडिसिन, होम सायन्स, संगीत, कृषी, हाॕस्पिटॅलिटी या महाविद्यालयांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Weekly Horoscope: ऑगस्टचा हा आठवडा ठरणार 'लकी', 'या' 4 राशींवर होणार धनवर्षाव; आर्थिक स्थितीत होणार मोठा बदल

SCROLL FOR NEXT