NAAC: गोव्यातील 'या' महाविद्यालयाला मिळाले नॅक समितीचे ‘ए’ मानांकन, मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.
Borda College
Borda CollegeDainik Gomantak
Published on
Updated on

बोर्डा सरकारी वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाला (Borda College) नॅक ‘ए’ मानांकन जाहीर केले आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद अर्थात नॅशनल ॲसेसमेंट अॕण्ड अॕक्रिडिटेशन कौन्सिल बेंगलोर (नॕक) समितीने 2 व 3 फेब्रुवारी 2023 रोजी समितीने महाविद्यालयाचे मूल्यांकन केलेले होते.

समितीने बोर्डा महाविद्यालयाला 3.12 च्या सीजीपीए स्‍कोअरसह ‘ए’ मानांकन जाहीर केले आहे. नॅकने दिलेल्या ‘ए’ मानांकनामुळे राज्यात सरकारी वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय बोर्डाचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

Borda College
Dabolim Airport: दोषी ! परदेशी महिलेकडून खंडणी, दाबोळी विमानतळावरील तीनजण निलंबित

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी देखील महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे. "बोर्डा महाविद्यालयाला 3.12 च्या सीजीपीए स्‍कोअरसह ‘ए’ मानांकन जाहीर केले आहे. मी सगळ्या टीमचे अभिनंदन करतो." अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Borda College
Kolhapuri Chappal: कोल्हापुरी चप्पलची न्यायालयातून निर्दोष मुक्तता! न्यायालयातील खटला रद्द

सरकारी वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय बोर्डाला भेट दिलेल्या नॅक समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ तेलंगणाचे माजी कुलगुरू सीतारामराव कुसुंबा, सिक्कीम विद्यापीठाचे डॉ. सुधांशू शेखर महापात्रा, आभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय अमरावती (महाराष्ट्र)चे माजी प्राचार्य डॉ. अनंत बी मराठे यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dhangar Community ST Status
Goa Police Recruitment
Goa Government Development Exhibition
home minister amit shah reviews goa st reservation file
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com