Coastal Zone Dainik Gomantak
गोवा

Goa Coastal Zone: गोव्याचा CZMP Plan लटकल्‍याने मोठी पंचाईत! आराखडा अंतिम करण्यास होणार विलंब

Goa Coastal Zone Management Plan: केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान मंत्रालयाच्या तांत्रिक समितीने मंजुरी देऊनही गोवा किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यातील दुरुस्ती लटकली आहे.

Sameer Panditrao

पणजी: केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान मंत्रालयाच्या तांत्रिक समितीने मंजुरी देऊनही गोवा किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यातील दुरुस्ती लटकली आहे. चेन्नई येथील निरंतर किनारी व्यवस्थापन केंद्र या केंद्र सरकारच्या संस्थेकडे हे काम सोपविण्यात आले आहे.

सीआरझेडच्या २०११ अधिसूचनेनुसार या संस्थेने केलेला आराखडा आणि राज्य सरकारच्या महसूल खात्याचे नकाशे जुळत नव्हते. त्यामुळे आराखडा अधिसूचित झाल्यानंतर त्यात दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी मागितली होती. ती दुरुस्ती झाल्यावर २०१९च्या अधिसूचनेनुसारचा आराखडा अंतिम करण्याकडे राज्य सरकार लक्ष पुरवणार आहे.

देशातील किनारपट्टी भागात पर्यावरण संरक्षण आणि विकास यात समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने २०११ मध्ये किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा यंत्रणा जाहीर केली. या आराखड्याचा उद्देश म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधता जपणे, मासेमारी व्यवसायास संरक्षण देणे, अनियंत्रित शहरीकरणाला आळा घालणे हा होता.

तथापि, २०१९ मध्ये केंद्र सरकारने या आराखड्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या सुचविल्या होत्या. या दुरुस्त्यांचा मुख्य हेतू पर्यटन, बंदरे, औद्योगिक प्रकल्प आणि इतर विकासकामांना चालना देणे हा होता. मात्र मूळ आराखडाच लटकल्याने ही दुरुस्ती अद्यापही लटकलेलीच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ये अज्ञानी', गोव्याला 'कायदाहीन' म्हणणाऱ्या केजरीवालांना भाजपने दिला दम; Post Viral

Goa Liquor Seized: 2 महिने गायब ट्रक सापडला कुंकळ्ळीत, तपासणीत मिळाली लाखोंची दारू; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

ED Raid: दुबईत हवालामार्गे गुंतवणूक! संशयावरून ‘ईडी’ची गोवा, दिल्लीत छापेमारी; अनेकजण ताब्यात

Goa Live News: डिचोलीच्या बगलमार्गावर गुराचा बळी

Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT