Pakistan Zindabad banner Goa Dainik Gomantak
गोवा

पाकिस्तान जिंदाबाद फलक प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून सक्त करावाईचे आदेश, अवैध मद्य तस्करीबाबतही इशारा

Goa illegal liquor smuggling: पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती चिघळण्यापूर्वी फलक बंद केला. पोलिसांनी दोन्ही दुकानदारांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Pramod Yadav

म्हापसा: बागा आणि हडफडे येथील दोन दुकानांवरील डिजिटल फलकावर पाकिस्तान जिंदाबाद लिहल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दुकान मालकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील याप्रकरणाची गंभीर दखल घेत सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत.

बागा आणि हडफडे येथील सलून आणि वाईन शॉपच्या दुकानावर असलेल्या डिजिटल फलकावर पाकिस्तान जिंदाबाद लिहल्याचे आढळून आले. रात्रीच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी कारवाईची मागणी केली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती चिघळण्यापूर्वी फलक बंद केला. पोलिसांनी दोन्ही दुकानदारांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना याबाबत विचारणा केली असता दुकानदारांनी विनापरवानगी फलक लावल्याचे सांगितले. दरम्यान, दोन्ही दुकानदारांविरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून, दुकान मालकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, डिजिटल बोर्ड हॅक केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

अवैद्य मद्य तस्करीप्रकरणी इशारा

राज्यातून सुरु असलेल्या अवैध मद्य तस्करीप्रकरणी मृख्यमंत्री तथ गृहमंत्री प्रमोद सावंत यांनी इशारा दिला असून, हा प्रकार खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

"कोणीही गोव्यात दारु घेऊन येऊ नये तसेच, अवैध पद्धतीने गोव्यातून बाहेरच्या राज्यात मद्य तस्करी करु नये. भेसळ आणि तस्करी विरोधात कडक कारवाई केली जाईल", असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''माझी साथ विसरलास का?'', विराटच्या प्रेमात बनवली रील, कोहलीला 'बेवफाह' म्हणणाऱ्या पोस्टवर अनुष्काची लाईक; Video

Video: गोवा किंवा देशात पाकिस्तानच्या समर्थनाथ घोषणाबाजी देण्याचे कोणालाच धाडस नाही, तरुणांनी शांत राहावे; मायकल लोबो

दक्षिण गोव्यातील खाण कामगार, खनिज वाहतूकदारांना काम मिळणार; 10 दहा ठिकाणी साठवलेल्या खनिजाचा लिलाव होणार

अभिनेता गौरव बक्शी पुन्हा अडचणीत, ओल्ड गोव्यात गुन्हा दाखल; मालमत्तेत घुसून धमकावल्याचा आरोप

Gold And Silver Price: सोन्या-चांदीच्या दराला मोठा ब्रेकडाऊन! 'एवढ्या' हजारांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याच्याही दरात घसरण; ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT