गोव्यात दारु आणि सलूनच्या दुकानांवर झळकले पाकिस्तान जिंदाबादचे फलक; गुन्हा दाखल

Pakistan Zindabad posters Goa:फलक झळकल्यानंतर स्थानिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली.
Pakistan Zindabad Posters in Goa
Pakistan Zindabad case GoaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोव्यात मंगळवारी (०४ नोव्हेंबर) रात्री एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. किनारी भागातील दोन दुकानांवर चक्क पाकिस्तान जिंदाबाद असे लिहलेले फलक झळकले. यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला स्थानिकांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली.

बागा आणि हडफडे येथे मंगळवार रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बागा येथील सलूनचे दुकान आणि हडफडे येथील वाईन शॉपच्या एलईडी डिजिटल बोर्डवर पाकिस्तान जिंदाबाद लिहल्याचे दिसून आले. फलक झळकल्यानंतर स्थानिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली.

Pakistan Zindabad Posters in Goa
Sarmanas Ferry: 15 वर्षांपूर्वी बुडाली फेरीबोट, कार दुर्घटना; सारमानस फेरीधक्का बनतोय मृत्यूचा सापळा

पोलिसांना माहिती मिळताच कळंगुट आणि हणजूण पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही दुकानांच्या मालकांना ताब्यात घेतले आहे. तसेच, परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी एलईडी बोर्डचे कनेक्शन देखील तात्काळ बंद करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही दुकानमालकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Pakistan Zindabad Posters in Goa
Ravi Naik Tribute : 'रवी नाईक' गोमंतकीयांसाठी होते जननेते! मडगावचो आवाजतर्फे ‘रिमेंबरिंग पात्रांव’ शोकसभा

दरम्यान, एलईडी सिस्टीम हॅक केली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असून, सर्व अँगल तपासून पाहत आहे. तसेच, फॉरेन्सिक पथक आणि सायबर पथकाच्या वतीने देखील नक्की हा प्रकार कसा घडला? याचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com