मनोज परबांपेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम, घाटी – घाटी करुनच त्यांचा आमदार निवडून आला; मेटींचा पलटवार

Meti Manoj Parab controversy: स्थलांतरितांना घाटी – घाटी म्हणून आरजीने एक आमदार निवडून आणला. अन्यथा त्यांना तेही शक्य नव्हते, अशी टीका मेटी यांनी केली
Goa News | Politics
Meti Manoj Parab controversy Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिद्धण्णा मेटी आणि रिव्होल्युशनरी गोवन पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. मेटी यांनी आम्हाला घाटी म्हणून हिणवू नये अशी विनंती करताच परब यांनी पत्रकार परिषद घेऊन मेटींचा समाचार घेतला. यानंतर आता पुन्हा मेटी यांनी परब यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज यांच्यापेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम असल्याचे मेटी म्हणाले आहेत.

मनोज परब यांच्या पत्रकार परिषदेनंतर आज मेटी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मनोज परब यांच्यापेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम आहे. कर्नाटक आमची जन्मभूमी आहे पण गोवा कर्मभूमी आहे. आम्हाला कर्नाटक आणि गोवा यांच्यातील संबंध दृढ करायचे आहेत, असे सिद्धण्णा मेटी म्हणाले.

Goa News | Politics
गोव्यात दारु आणि सलूनच्या दुकानांवर झळकले पाकिस्तान जिंदाबादचे फलक; गुन्हा दाखल

रिव्होल्युशनरी गोवन पक्षाने स्थलांतरितांना घाटी – घाटी म्हणून एक आमदार निवडून आणला. अन्यथा त्यांना तेही शक्य नव्हते, अशी टीका मेटी यांनी केली.

एवढेच नव्हे तर आरजीपी स्थलांतरितांना टार्गेट करुन गोमंतकीय जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आरजीपी ब्रिटीशांप्रमाणे फोडा आणि राज्य करा असे धोरण अवलंबण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप मेटी यांनी केला.

Goa News | Politics
Valvanti Chikhal Kalo: 'हरी रे माझ्या पांडुरंगा'! वाळवंटीकाठी रंगला चिखलकाला, बालगोपाळांत संचारला उत्साह Video

सिद्धण्णा मेटी यांनी सोमवारी मनोज परब स्थलांतरितांना टार्गेट करत असल्याचा आरोप केला होता. तसेच आम्हाला घाटी म्हणून हिणवू नका, अशी विनंतीही केली होती. परब यांनी गरिबांना त्रास देऊ नये मोठ्या लोकांच्या मागे लागावं, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. परब यांची सर्व कुंडली लोकांकडे असल्याचा इशाराही मेटींनी दिला होता.

यावर परब यांनी मेटींना जोरदार प्रतित्युत्तर दिले होते. मेटी यांनी म्हादई नदीविषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. याबाबत त्यांनी कर्नाटक सरकारला देखील जाब विचारला पाहिजे, असे आव्हान परबांनी मेटींना दिले.

तसेच, घाटी हा शब्द राज्यात प्रामाणिक काम करणाऱ्या परप्रांतीयांसाठी नव्हे तर गोव्यात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांसाठी वापरला जातो, असेही परब यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com