Goa Floods: CM Pramod Sawant and PM Narendra Modi Dainik Gomantak
गोवा

Goa Floods: पंतप्रधानांची गोवेकरांना मदतीची ग्वाही

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पीएम मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी पूर (Goa Floods) परिस्थितीच्या आढाव्याबाबत बातचीत केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पीएम मोदीं यांच्याशी पूर परिस्थितीच्या आढाव्याबाबत बातचीत केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्राने त्यांच्याशी बोलल्यानंतर पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली. (Goa CM Pramod Sawant held talks with PM Modi and Union Home Minister Amit Shah to flood situation)

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेविषयी ट्वीट करताना म्हटले आहे की, "संतत पडत असेलल्या पाऊसामुळे गोव्यातील सध्याच्या पूर परिस्थितीत लोकांच्या सुरक्षिततेची व लोकहिताची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधानांशी बातचीत केली. पंतप्रधानांनी राज्याला पूर्ण सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे."

दुसर्‍या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, "संततधार पाऊस पडल्यामुळे गोव्यातील पूर परिस्थितीबद्दल माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री अमितशाह जी यांना राज्यात होणाऱ्या व्यापक नुकसानीची माहिती दिली. मदतकार्य करण्यासाठी गृहमंत्र्यांनी सर्व आवश्यक मदतीची ग्वाही दिली आहे."

पूरग्रस्त भागाची तपासणी

गोव्यातील काही भागात मुसळधार पावसाने कहर निर्माण केला असून शेकडो घरे अडकून पडली आहेत. रेल्वे आणि रस्ता वाहतुकीस विस्कळीत झाली आहे. काल सावंत बिचोलीम तालुक्यातील विविध भागात संततधार पाऊस झाल्याने पूरग्रस्त भागांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. जेथे त्यांनी अधिकाऱ्यांना पुरात अडकलेल्या लोकांची तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले.

हरवलीममध्ये 23 जणांना वाचविण्यात आले आणि सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. परिस्थितीच्या तीव्रतेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुरुवारी रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आणि राज्यात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT