Goa CM Pramod Sawant X Handle
गोवा

'हलगर्जी सहन केली जाणार नाही', CM प्रमोद सावंत आक्रमक, अधिकाऱ्यांना खडसावले

Goa CM Pramod Sawant: जनतेची कामे वेळेत होण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आवश्यक आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: प्रशासनाची ढासळलेली बाजू रुळावर आणण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आक्रमक बनले असून आज विविध सरकारी विभागांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत दोन तासांची मॅरेथॉन बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

जनतेची कामे वेळेत होण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आवश्यक आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची हलगर्जी सहन केली जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा पाहून सनदी अधिकारीही स्तंभित झाले. चार दिवसांपूर्वीच आपत्ती व्यवस्थापन बैठकीत खाते प्रमुखांना बोलावण्याची तसदी न घेतल्याने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी कानउघाडणी करत प्रशासन गतिमान करण्यासाठी ठोस पावले उचलली.

अशा केल्या सूचना

१) विविध सरकारी विभागांच्या सचिवांना सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त यावी आणि नागरिकांना सरकारी सेवांचा विलंब किंवा गैरसोय न होता लाभ घेता यावा यासाठी त्यांची क्षेत्रीय कार्यालये बळकट करणे.

२) महसूल तुटीमधील कारणे शोधून तो वाढविणे. तसेच सार्वजनिक सेवा वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी कटाक्ष असावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tisk-Usgao Accident: मध्यरात्री 'नेस्ले कंपनीच्या' समोर दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात; मागे बसलेला युवक जखमी

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

कलारंगाची उधळण करणारा Colors of Resilience! दिव्यांगांसाठी नवीन अध्यायाची सुरुवात..

SCROLL FOR NEXT