Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM प्रमोद सावंतांनी गिरवला पर्रीकरांचा कित्ता, धडक भेटीने अधिकारी हबकले, खात्याचा घेतला आढावा

Goa CM Dr. Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी या अचानक भेटीची सुरवात कौशल्य विकास खात्याच्या मुख्यालयापासून केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना ते कोणत्या कार्यालयात कधी शिरतील याचा कोणाला नेम नसायचा. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री कधीही तपासणीसाठी येतील अशी एक धास्ती होती. तोच कित्ता गिरवताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी कार्यालयांना अचानक भेटी देणे आता सुरू केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी या अचानक भेटीची सुरवात कौशल्य विकास खात्याच्या मुख्यालयापासून केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कौशल्य विकास खात्याच्या मुख्यालयाला भेट देऊन तेथील कामकाज जाणून घेतले आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. उद्योजकता विकासासाठी हे कार्यालय महत्त्वाचे असल्याने त्यांनी संबंधितांना तशा सूचनाही केल्या.

"कामकाजाला बळकटी देण्यासाठी: आणि लोकांना चांगली सेवा देण्यासाठी विविध विभागांच्या कार्यालयांचा कामकाजाचा प्रत्यक्षातील आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,' असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

अधिकाऱ्यांना सूचना

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा कौशल्य विकास आणि उद्योजकता मुख्य कार्यालयाला भेट दिली, पाहणी केली आणि आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि विभागाकडून कौशल्य विकासाला बळ देण्यासाठी आवश्यक असलेल्या बदलांबद्दल अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT