Goa CM inaugurates Thimaaveshi Boat  Dainik Gomantak
गोवा

Thimaaveshi Boat: गोव्याचे मालदिवला गिफ्ट; थिमावेशी बोटीला मुख्यमंत्र्यांनी दाखवला झेंडा

30 मीटर लांबीच्या बोटीचे अनावरण

Akshay Nirmale

Goa CM Pramod Sawant inaugurates Thimaaveshi Boat: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सोमवारी थिमावेशी या बोटीचे अनावरण करण्यात आले. ही बोट मालदीव या देशाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी या बोटीला हिरवा झेंडा दाखवला.

विजय मरीन शिपयार्डने ही नौका बनवली आहे. 30 मीटर लांबीच्या या कॅटॅमारन बोटीचा वापर गस्तीसह संशोधनासाठी केला जाणार आहे. या वेळी आमदार अॅलेक्स सिक्वेरा यांच्यासह सरकार आणि प्रशासनातील तसेच गोवा शिपिंग इंडस्ट्रिशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेतील ही पहिली 30 मीटर लांबीची कॅटॅमरान बोट आहे. ही बोट बनवल्याबद्दल गोवन शिप इंडस्ट्रीजचे अभिनंदन. मेक इन इंडिया प्रमाणे मेक इन गोवा असलेली ही शिप म्हणजे गोवेकरांसाठी अभिमानास्पद क्षण आहे.

ही बोट आता मालदीव सरकारला हस्तांतरित केली जाणार आहे. गोव्यातील शिप इंडस्ट्रीने गोव्याच्या स्वातंत्र्यापासूनच राज्याच्या विकासात मोठा वाटा उचलला आहे. लहान, मोठ्या बोटी येथील शिप इंडस्ट्रीने बांधल्या आहेत. या बोटीसाठी मालदीव सरकारचेही अभिनंदन.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रीफळ वाढवून बोटीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी तिरंगी रंगातील फुगे आकाशात सोडण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी संपुर्ण बोटीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बोटीविषयी सर्व माहिती घेतली.

उथळ पाण्यात तसेच खोल समुद्रात ही बोट कशी कार्यरत राहिल, याबाबत माहिती त्यांनी जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी बोटीच्या कॅप्टनच्या केबिनमध्येही काही काळ व्यतीत केला. बोट चालविण्याचाही अनुभवही त्यांनी घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT