Sonsodo Project : 15 टीपीडी बायोमिथेनेशन प्रकल्पाची वर्षभरात उभारणी करणार

सोनसडो प्रकल्पाबाबत उच्चस्तरीय कमिटीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
High Powered committee Meeting
High Powered committee MeetingDainik Gomantak

सोनसडोतील ओल्या कचऱ्यासाठी 15 टीपीडी बायोमिथेनेशन प्रकल्पाची उभारणी वर्षभरात करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ता, शेड, संरक्षक भिंत व लिचड साठवणूक टाकी उभारणी 30 जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

तसेच सध्या 10 टन कचऱ्यावर साळगांव येथील प्रकल्पामध्ये प्रक्रिया करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. उच्चस्तरीय कमिटीने आज सोनसोडो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, फातोर्डा मतदारसंघांचे आमदार विजय सरदेसाई, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर उपस्थित होते.

High Powered committee Meeting
Loutolim Robbery Video: ओ गॉड, ओ गॉड... महिला ओरडत राहिली पण, बाकावर बसलेल्या वृद्धेच्या हातातून चोरी केल्या सोन्याच्या बांगड्या

मडगाव नगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सीईओकडे प्रकल्पाचे काम पाहण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री या प्रकल्पासंबंधात सरकार गंभीर आहे. आज घेतलेले निर्णयाच्या कामांची पुढील दोन महिन्यात आयोजित बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी सरदेसाई म्हणाले, राज्यात चार मुख्यमंत्री झाले परंतु प्लांट सेटपच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. सरकारला दोन वर्षांनी जाग आली. आज झालेल्या निर्णयांचे काम सुरु झाल्यानंतर मी खुश होईन. प्रकल्पाबाबत जी काही मदत हवी असेल ती मी करण्यास तयार आहे. सरकार चुकीच्या निर्णयावर मी आवाज उठविणार असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com