मडगावचा कंदब बसस्थानक प्रकल्प केंद्रीय भू-पृष्‍ठ वाहतूक मंत्रालयातर्फे

दिगंबर कामत : मंजुरी मिळाली; लवकरच प्रक्रिया करणार सुरू
Digambar Kamat |Goa News
Digambar Kamat |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी : मडगावचा कंदब बसस्थानक प्रकल्प केंद्रीय भूपृष्‍ठ वाहतूक मंत्रालयातर्फे पूर्ण केला जाईल. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी या प्रकल्पाला मंजुरीही दिली आहे. ही माहिती स्वत: दिगंबर कामत यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयातर्फे सदर प्रकल्प हातात घेतला तर तो चांगल्या पद्धतीने व कमीत कमी वेळेत पूर्ण होऊ शकेल. शिवाय सार्वजनिक खासगी भागिदारीचा प्रश्र्नही उदभवणार नाही. कदंब बसस्थानक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे लवकरच प्रक्रिया सुरू केली जाईल असेही कामत यांनी सांगितले.

Digambar Kamat |Goa News
Power Outage in South Goa: नळ कोरडे, वीज गुल; लोक गेले निसर्गाच्या सान्निध्यात पिकनिकला

दक्षिण गोव्‍यात वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज

सध्‍या दक्षिण गोव्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या घोषणेवरून जो वाद चाललाय त्‍याबाबत दिगंबर कामत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, दक्षिण गोव्यात अत्‍याधुनिक वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता आहेच.

Digambar Kamat |Goa News
Goa Congress: राजीव गांधींचे राष्ट्र, गोव्यासाठीचे योगदान युवकांनी जाणून घ्यावे

आता हे नेमके महाविद्यालया कुठे व कधी सुरू केले जाईल याबद्दल मात्र त्यांनी काहीच सांगितले नाही. तरीही ते म्‍हणाले की, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील वरचे दोन मजले रिकामे आहेत. तिथे हे महाविद्यालय सुरू करण्‍यास हरकत नाही.

या हॉस्पिटलात 800 खाटांचे नियोजन आहे. सद्या केवळ 500 खांटापुरते हे हॉस्पिटल सुरू केले असून ते पुरेसे आहे. जर महाविद्यालय व हॉस्पिटल एकत्रितपणे कार्यरत झाले तर सर्वांसाठीच ते उपयुक्त ठरेल व सर्वांनाच त्याचा लाभ मिळेल.

Digambar Kamat |Goa News
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

‘सोनसोडो’बाबत आज उच्चाधिकार समितीची बैठक

  • उद्या सोमवार दि. 22 मे रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सोनसोडो कचरा प्रकल्पाच्या उच्चाधिकार समितीची बैठक बोलावली आहे प्रदीर्घ काळानंतर ही बैठक होत असल्याचे दिगंबर कामत यांनी सांगितले. सोनसोडो कचरा प्रकल्पाबाबत उच्च न्यायालयाने काही सूचना केल्या आहेत. त्यासंदर्भात चर्चा केली जाणार असून कामाचा आढावा घेतला जाईल असे ते म्हणाले.

  • या बैठकीला कामत यांच्‍यासह फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स उपस्थित असतील. दरम्‍यान, दोनच दिवसांपूर्वी आमदार विजय सरदेसाई यांनी कचऱ्याचा जो ढिगारा तयार झाला आहे त्याबद्दल चिंता व्‍यक्त करून पावसाळ्यात हा कचरा खाली येण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून उच्चाधिकारी समितीची बैठक बोलावण्याची विनंतीही केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com