CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : मोपाच्या नामांतरावर सूचक मौन; पर्रीकरांच्या नावावर मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलं

एकीकडे मनोहर पर्रीकर यांचं नाव मोपा विमानतळाला देण्याची चर्चा सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचं वान विमानतळाला देण्याचा सूर दिसू लागला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport : मोपा विमानतळाचं लोकार्पण येत्या 11 डिसेंबर रोजी केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मोपाचं उद्घाटन केलं जाईल. मात्र उद्घाटनापूर्वीच मोपा वादात सापडलं आहे. मोपाच्या नामांतराचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. एकीकडे मनोहर पर्रीकर यांचं नाव मोपा विमानतळाला देण्याची चर्चा सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचं वान विमानतळाला देण्याचा सूर दिसू लागला आहे. मात्र या सगळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सूचक मौन बाळगलं आहे.

गोवा राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोपा विमानतळ नामकरणावरुन चर्चेला उधाण आले आहे. याला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे, कारण मोपा विमानतळाला गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात यावे, या गोवा सरकारच्या भुमिकेला केंद्र सरकारने देखील आता हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी अद्यापही याबाबत कोणतीही जाहीर भूमिका घेतलेली नाही. नामांतराच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर देणं टाळलं आहे.

मोपा विमानतळाला कोणाचे नाव दिले जाणार याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. विमानतळाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात यावे, याबाबत प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. दरम्यान, मनोहर पर्रीकर यांचे नाव विमानतळाला देणार का? याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोलणे टाळले. त्यामुळे मोपा कोणाचे नाव दिले जाणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धा टन करणार आहेत. मोपा विमानतळावरील विमान सेवा पाच जानेवारीपासून सुरू होणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. मोपाची पहिली फेज 100 टक्के पूर्ण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT