Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: वाढदिवस साजरा करणार नाही! पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय; सर्व कार्यक्रम रद्द

Goa CM Pramod Sawant: सेवाकार्य वगळता वाढदिवसानिमितत्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला आहे.

Pramod Yadav

पणजी: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. याचवेळी मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी (२४ एप्रिल) असलेला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पर्वरी येथील मंत्रालयात (२३ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. "गुरुवारी माझ्या वाढदिवासनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम मी रद्द करत आहे. केवळ सेवा कार्यक्रम (वैद्यकीय तपासणी कॅम्प आणि इतर सेवा कार्य) होतील. वाढदिवासानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यास मी साखळी किंवा पणजीत उपलब्ध नसेन, त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते, चाहते आणि शुभचिंतकांनी वाढदिवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये. पण, नियोजित सेवाकार्य सुरुच राहिल", असे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

यापूर्वी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यात मृत झालेल्यांना त्यांनी श्रद्धाजंली अर्पण करताना जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. "धर्म विचारुन गोळीबार करणे हे खेदजनक असून, गोवा सरकार या घटनेचा तीव्र निषेध करते", असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अखंड भारताचे स्वप्न ३७० कलम रद्द करुन साकार झाले, यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली होती. दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी पंतप्रधान मोदी कठोर पाऊले उचलतील अशी मला खात्री आहे. यासाठी गोवा सरकार आणि गोमंतकीय त्यांच्यासोबत आहेत", असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

Basketball World Championship: गोव्याचा जेशुआ भारताच्या प्रतिनिधित्वासाठी सज्ज, 19 जूलैपासून रंगणार जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा

SCROLL FOR NEXT