
कर्नाटक अर्थसंकल्पावर मी काय बोलणार? म्हादईबाबत सरकारला गांभीर्य आहे आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
केंद्राकडून पणजी स्मार्ट सिटीला 51 प्रकल्पांसाठी एकूण 1051 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
कामुर्ली येथे घराला भीषण आग लागली. गवताला लागलेली आग घरापर्यंत पसरल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. म्हापसा अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. या आगीत तब्बल 2 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्या अतिशी मार्लेना गोव्यात दाखल झाल्या आहेत. यावेळी गोव्याचे आप नेते अमित पाटकर यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. अतिशी यांच्या गोवा दौऱ्यामुळे अनेक राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत. गोव्यात आम आदमी पक्षाची 2027 विधानसभा निवडणूकीसाठी काय रणनिती असणार यावर चर्चा होणार असल्याचे राजकीय तज्ञांकडून सांगितले जात आहे.
कोलवाळ, म्हापसा आणि साळगाव पोलिसांच्या विशेष मोहिमेंतर्गत थिवी रेल्वे स्थानक, म्हापसा बसस्थानक आणि साळगावमध्ये कामगारांची भाडेकरु पडताळणी सुरु.
आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १९ तारखेला संप करण्याची नोटीस आम्ही खात्याला दिली आहे आणि त्याच संपाचा भाग म्हणून आज मध्यरात्री पासून मी एक दिवसीय उपोषणासाठी श्रमशक्ती भवन समोर बसणार आहे. : कामगार नेते कॉम्रेड क्रिस्तोफर फोन्सेका. कदंबा कामगाराच्या प्रलंबित मागण्या अजून पूर्ण झाल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा त्याबाबत ची फाईल या खात्यातून त्या खात्यात फिरत आहे. यामुळे या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कण्याची मागणी AITCU ने केली आहे.
मडगावात शिमगोत्सवाला उद्यापासून (ता. १०) सुरवात होत असून १६ मार्च हा मुख्य दिवस आहे. या दिवशी रोमटामेळ, लोकनृत्य व चित्ररथ मिरवणुकीचे तसेच वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती मडगाव शिमगोत्सव समितीचे उपाध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर व नगराध्यक्ष तथा समितीचे खजिनदार दामोदर शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वडबाग उसगांव येथे पाणीटंचाई दिवसे दिवस वाढत असल्याने आज फोंडा येथील पाणीविभाग कार्यालयावर महिलांचा घागर मोर्चा.
नामांकित IIFA awards या चित्रपट क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात आदित्य जांभळे यांस ARTICLE 370 या चित्रपटास उत्कृष्ट संवादचे पारितोषिक प्राप्त झाले. तसेच उत्कृष्ट चित्रपट व उत्कृष्ट दिग्दर्शक या विभागात नामांकन श्री. आदित्य जांभळे यांना मिळाले होते. कुर्टी, फोंडा, गोवा येथील आदित्य जांभळे यांना यापूर्वी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या २ लघुपटाना राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
श्री खाप्रेश्वर देवस्थान मुद्यावर ब्रम्हेशानंद स्वामी समोर येत म्हणालेत की, "विकासाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे".
श्री माधवराव ढवळीकर ट्रस्ट आयोजित महिला मेळाव्याचे डॉ.स्वाती वैध यांच्या हस्ते शानदार उद्घाटन.सोबत वीजमंत्री सुदीन ढवळीकर,डॉ.ललना बखले,अभिनेत्री आर्या आंबेकर तसेच हजारों संख्येने महिला उपस्थित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.