Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

गोवा भाजप सरकार विरोधात पुन्हा Toolkit? पर्यटन, टॅक्सीच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांना घेरले; पोस्टचा पाऊस

Goa Politics News: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर सोशल मिडियावर त्यांच्यासह सरकारविरोधात टीका सुरु झाली आहे.

Pramod Yadav

पणजी: गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना घेरण्यासाठी टूलकिटचा वापर करण्यात आल्याचा आरोप झाला. कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री सावंत यांच्या विरोधात टूलकिट सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. पर्यटन आणि टॅक्सीच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री सावंत यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात असून, याबाबत शेकडो पोस्ट सोशल मिडियावर करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, आमदार मायकल लोबो देखील हजर होते. यानंतर विशेषत: या पोस्ट सुरु झाल्याचे दिसते.

काय आहेत पोस्ट?

"राज्यात ओला, उबर, रॅपीडो यांना थारा नाही. मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली फक्त टॅक्सी माफियांचे राज्य आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी या माणसाने गोव्याच्या पर्यटनाचा नाश केला," अशा आशयाची पोस्ट एक्स या समाज माध्यमावर अंकीत मयांक या व्यक्तीने केली आहे. या व्यक्तीने त्याच्या बायोमध्ये तो उद्योजक असण्यासह काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा चाहता असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेसची प्रतिक्रिया

अंकित यांच्या या पोस्टला रिपोस्ट करत काँग्रेस नेत्या अंजली निंबाळकर यांनी सहमती दर्शवली आहे. "मी पूर्णपणे सहमत आहे. केवळ टॅक्सी माफिया नव्हे तर लँड माफियांनी देखील गोव्याच्या पर्यटनाचा ऱ्हास केला आहे. याशिवाय भ्रष्टाचार आणि महिलांची सुरक्षा हे मुद्दे देखील आहेत," अशी प्रतिक्रिया निंबाळकर यांनी दिली आहे. त्या गोवा काँग्रेसच्या उपप्रभारी देखील आहेत.

“गोव्याच्या पर्यटनाला फटका बसत असताना, मुख्यमंत्री सावंत राज्याची ओळख आणि अर्थव्यवस्था सांभाळण्याऐवजी टॅक्सी माफियांचे समर्थन करत आहेत. आदर, योग्य वागणूक हा पर्यटकांचा हक्क आहे. गोव्याची ओळख जपणाऱ्या नेत्याची राज्याला गरज आहे, तो नव्हे जो राज्य विकेल,” अशी पोस्ट आयेशा माजिद खान या महिलेने लिहली आहे.

"टॅक्सी माफियांविरोधात कारवाई न करणे ही मुख्यमंत्री सावंत यांची हतबलता नाही तर मतं आणि छुप्या फायद्यांसाठी ही जाणिवपूर्वक शांतता आहे. प्रत्येक स्थानिक आमि पर्यटक याची किंमत मोजतो. गोव्याला धाडसी नेत्याची गरज आहे, माफियांपुढे झुकणाऱ्या नेत्याची गरज नाही," अशी पोस्ट नाजीर हुसैन या व्यक्तीने केली आहे.

याशिवाय सीए फेल्स गोवा #CMFailsGoa हा हॅशटॅग वापरुन मुख्यमंत्री सावंत यांच्यावर टीका करणाऱ्या जवळपास शेकडो पोस्ट एक्सवर करण्यात आल्या आहेत. राज्यातील पर्यटन कमी होत आहे, बेरोजगारी वाढली आहे, विद्यार्थ्यांकडे दुर्लेक्ष केले जात आहे. मुख्यमंत्री सावंत राज्याची अर्थव्यवस्था वाचविण्यात अपयशी ठरल्याची टीका विविध पोस्टमधून करण्यात आली आहे.

पर्यटन गोव्याचा आत्मा असून, त्याकडे अक्षम्य दुर्लेक्ष होत असल्याचा आरोप विविध पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. किनारी भागात वाढते अतिक्रमणाचा पर्यावरणाला देखील फटका बसत असल्याचे अनेकांनी मत मांडले आहे. अनेकांनी नुकतेच पेडणे येथे १७ वर्षीय मुलावर झालेल्या असिड हल्ल्याचे उदाहरण देत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असल्याचे म्हटले आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये गोवा भाजप सरकारविरोधात टूलकिट चालवले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. कॅश फॉर जॉब स्कॅमवरुन मुख्यमंत्री सावंत यांना राज्य तसेच देश पातळीवर लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप झाला होता. यात काही भाजपमधील नेत्यांचा समावेश असल्याचे देखील आरोप झाला.

दरम्यान, पुन्हा एकदा पर्यटन आणि टॅक्सी माफियाचा मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT