
Toolkit on Cash For Job Scam Against Goa CM Pramod Sawant
पणजी: कॅश फॉर जॉब अर्थात नोकरीविक्री घोटाळ्याप्रकरणी गोव्यातील भाजप सरकार अडचणीत आले असतानाच दिल्लीस्थित पत्रकाराचे सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. गोवा सरकार आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यासाठी ‘टूलकिट’चा वापर झाला आणि यात दिल्लीतील बड्या पत्रकारांचाही समावेश असल्याचा दावा या पत्रकाराने केला आहे. मात्र, या वृत्ताला गोवा सरकार किंवा तपास यंत्रणांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.
दिल्लीतील एका हिंदी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने एक्सवरती (पूर्वीचे ट्विटर) याबाबत एक पोस्ट केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना बदनाम करण्याचा कट उघडकीस आल्याचा दावा पत्रकाराने केलाय. राज्यात गाजत असलेल्या कॅश फॉर जॉब प्रकरणी सोशल मिडिया आणि माध्यमांत बातम्या पेरण्याच्या षडयंत्राचा भांडाफोड झाल्याचे पत्रकाराने पोस्टमध्ये म्हटलंय.
'गोवा सारख्या छोट्या राज्यातील या घटनेवर शो करुन त्याला राष्ट्रीय मुद्दा करण्याचा प्रयत्न केला. राज्यातील काही स्थानिक नेते देखील या कटाचा भाग आहेत. दिल्ली आणि मुंबईतील एक पीआर कंपनी हॅशटॅग तयार करुन व्हायरल करत आहे. टूलकिट आजही #GoaCMResign ट्रेंड चालवत आहेत', असा दावा या पत्रकाराने पोस्टमधून केला आहे. दरम्यान, पत्रकाराच्या दाव्याला गोवा सरकार किंवा तपास यंत्रणांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.
गोव्यातील भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सावंत यांच्यासह मंत्री विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो आणि रोहन खंवटे यांना टार्गेट करण्यासाठी पीआर एजन्सी नियुक्त केल्याचा आरोप केला. सध्या ही एजन्सी दिल्लीतील एका राष्ट्रीय पक्षासाठी काम करत असल्याचा दावा सावियो यांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.