Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; निबंधकांचा आदेश आणि गोविंदरावांचा जावईशोध!

Khari Kujbuj Political Satire: दोनपेक्षा जास्त टर्म एकच व्यक्ती ‘उटा’च्या अध्यक्षपदी आणि इतर पदांवर असणे हे चुकीचे आहे.

Sameer Amunekar

निबंधकांचा आदेश आणि गोविंदरावांचा जावईशोध!

दोनपेक्षा जास्त टर्म एकच व्यक्ती ‘उटा’च्या अध्यक्षपदी आणि इतर पदांवर असणे हे चुकीचे आहे. पण यासाठी सरकारचे निबंधक जबाबदार असल्याचा जावईशोध आता गोविंद गावडेंनी लावलाय. सरकारी निबंधकांनी म्हणे अशा नेमणुका का होऊ दिल्या? असा प्रतिप्रश्‍‍न आता गोविंदराव करत आहेत. आपली चूक झाकण्यासाठी म्हणे ‘उटा’वर बंदीचा आदेश निबंधकांकडून काढण्यात आलाय असा दावा गोविंद करतायत. इतकेच नाही तर सहकार निबंधकांनी देवळात यावे असे उलट आवाहनही गावडेंनी केलेय. ‘उटा’ संघटनेच्या नियमावलीत दोनपेक्षा जास्त टर्मवर एकाच व्यक्तीची निवड होऊ शकत नाही याची म्हणे त्यांना कल्पना नव्हती. वा रे वा, म्हणजे ज्या संघटनेची ढाल बनवून गावडे आपले संरक्षण करत होते आणि जे गेली १५ वर्षे ‘उटा’चे निमंत्रक आहेत, त्या गावडेंना ‘उटा’ची साधी नियमावलीही माहिती नसणे याचा अर्थ काय? ही संस्थेचे भले करण्याची चिन्हे की संस्थेच्या माध्यमातून स्वत:चे भले करणे? असे प्रश्‍‍न आता एसटी बांधवांनाच गोविंद गावडे यांच्या बाबतीत पडू लागले आहेत. त्‍याबाबत आता चर्चाही सुरू झाली आहे.

गोविंदना आता ‘अंडरकरंट’चा साक्षात्कार

मुख्यमंत्र्यांनी गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांना सरकारविरोधातील ‘अंडरकरंट’ आठवू लागलाय. सरकारच्या विरोधात म्हणे प्रचंड ‘अंडरकरंट’ आहे आणि त्याचा शॉक कधीही बसू शकतो असा साक्षात्कार गोविंद बोलून दाखवू लागले आहेत. खुर्ची गेल्यानंतर म्हणे माणूस खरे बोलू लागतो असे म्हणतात. त्यामुळे गोविंदांचा साक्षात्कार खरा होईल की काय? हे भविष्यातच कळेल.

सर्वपक्षीय नीळकंठ?

कुर्टी-खांडेपार पंचायतीचे सरपंच नीळकंठ नाईक हे स्वतःला भाजपचे कार्यकर्ते म्हणवून घेतात. पण वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांबरोबर असलेली त्यांची जवळीक पाहिली तर ते नेमके कोणत्या पक्षाचे, हा प्रश्‍‍न कुणालाही पडावा. कुर्टी-खांडेपार पंचायतीवर भाजपचे पंचायत मंडळ होते, मात्र नीळकंठरावांनी मगोचे डॉ. केतन भाटीकर यांना जवळ जाऊन आणि काँग्रेस सदस्यांना आपल्या बाजूने ओढले. काल हेच नीळकंठराव विजय सरदेसाई यांच्याबरोबर गोवा फॉरवर्डच्या व्यासपीठावर दिसले. प्रकाश वेळीप यांनी पक्षाच्या विरोधात वक्तव्य केले म्हणून भाजप त्यांच्यावर कारवाई करण्याची भाषा करत आहे, पण या नीळकंठरावांचे हे कारनामे पक्षाला दिसत नाहीत का?, का आता गोव्यातील भाजपमध्‍ये शिस्त आणण्यासाठी पुन्‍हा सतीश धोंड यांना बोलावण्याची वेळ या पक्षावर येईल?

रावणफोंड पुलाचे भिजत घोंगडे!

मडगावच्या पूर्व बगलमार्गावरील रावणफोंड रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्याचा काही भाग खचल्यास महिना उलटून गेला. त्यानंतर खबरदारीचा भाग म्हणून तो पूल व रस्ता काही दिवस वाहतुकीस बंद केला गेला. मागाहून तो हलक्या वाहनांसाठी खुला केला गेला. नंतर त्या भागाला बळकटी वगैरे दिली गेली, पण अजून तो अवजड वाहनांना खुला केला न गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कारण प्रवासी बसेस तेथून येऊ शकत नाहीत. परप्रांतीय मालवाहू वाहनांना कल्पना नसल्याने रोज अनेक वाहने येऊन खोळंबतात. वाहतुकीसाठी हा महत्त्‍वाचा रस्ता आहे. पण या बगलरस्त्याच्या सुरवातीस म्हणजे आर्लेम येथे वाहतूक निर्बंधाची कोणतीही सूचना लावण्याची तसदी संबंधितांनी घेतलेली नाही. त्‍यामुळे हे वाहतूकदार यंत्रणेच्या नावाने बोटे मोडतात व हीच का ती डबल इंजीन सरकारची कार्यक्षमता, असे विचारतात.

‘जेट पॅचर’ गेले कुठे?

गेल्या वर्षी म्हणजे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांच्‍याकडे सार्वजनिक बांधकाम खाते असताना त्यांनी पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी लाखो रुपये खर्चून दोन ‘जेट पॅचर’ नामक अद्ययावत यंत्रे आणली होती. या यंत्रांनी किती काम केले ते ती आणणाऱ्यांनाच माहीत. पण रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतच्या लोकांच्या तक्रारी काही कमी झालेल्या नाहीत. नंतर ही यंत्रे कोणाच्‍या खिजगणतीतही नव्हती. पण परवा चिराग नायक यांनी स्वखर्चाने शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे जाहीर केले व आश्चर्याची बाब म्हणजे मडगावात पुन्‍हा म्हणे जेट पॅचरचे दर्शन झाले. त्यांनी काम कुठे केले, ते मात्र समजू शकले नाही. मुद्याची बाब म्हणजे मडगावात दरवर्षी हॅाटमिक्स डांबरीकरण होत असल्याने रस्ते सुस्थितीत आहेत. मग हे जेट पॅचर कशासाठी प्रकटले व गेले कुठे? असा प्रश्‍‍न अनेकांना पडला.

अन्‌ काब्राल ‘मुख्‍यमंत्री’

‘माझी मुख्‍यमंत्री म्‍हणून नेमणूक केल्‍यास मी तेसुद्धा पद स्‍वीकारायला तयार आहे’ अशा प्रकारचे वक्‍तव्‍य कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी एकदा केले होते. अर्थातच त्‍यांचे हे वक्‍तव्‍य तसे सीरियस नव्‍हते. तुम्‍हाला मंत्रिपद दिल्‍यास तुम्‍ही घेणार का? असा प्रश्‍‍न विचारला असता, ‘मंत्रीच काय मुख्‍यमंत्री केले तरीही ते पद स्‍वीकारण्‍यास मी तयार आहे’ असे त्‍यांनी मजेने म्‍हटले होते. मागच्‍या आठवड्यात असाच प्रसंग पुन्‍हा एकदा घडला. अवेडे येथे अवेडे-पारोडा लायन्‍स क्‍लबच्‍या अधिकारग्रहण सोहळ्‍याला प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित असलेले काब्राल यांचा उल्‍लेख या क्‍लबचे मावळते अध्‍यक्ष उज्‍ज्‍वल गावस देसाई यांनी अनावधनाने ‘मुख्‍यमंत्री’ असा केला आणि नंतर सूत्रसंचालन करणाऱ्या माफाल्‍द फर्नांडिस यांनी काब्राल मुख्‍यमंत्री झाल्‍यास आम्‍हालाही ते आवडेल, असा उल्‍लेख केला. मात्र, ‘मी पुढे काय होणार हे सर्व लोकांवरच अवलंबून आहे’ असे सांगून काब्राल यांनीही यावेळी वेळ मारून नेली. शेवटी इच्‍छा, आशा ही प्रत्‍येकाला असतेच.

प्रकाश वेळीप आणि भाजप

एकेकाळी भाजप सरकारमध्‍ये मंत्री असलेले व त्‍यानंतर भाजपच्‍या प्रदेश कार्यकारिणीत उपाध्‍यक्षपद भूषवलेले ज्‍येष्‍ठ एसटी नेते प्रकाश वेळीप हे सध्‍या भाजपमध्‍ये आहेत का, या चर्चेने आता जोर धरला आहे. वेळीप यांना नव्‍या प्रदेश कार्यकारिणीत कुठलेही स्‍थान देण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे दोन दिवसांपूर्वी मडगावात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत त्‍यांनी ‘आपण भाजपच्‍या प्रदेश कार्यकारिणीत होतो, आता नाही’ असा उल्‍लेख केला होता. त्‍यानंतर केपे एसटी मोर्चाच्‍या पदाधिकाऱ्यांनी मडगावात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत प्रकाश वेळीप हे भाजपचे सदस्‍य आहेत की नाहीत, यावरच प्रश्‍‍नचिन्‍ह उपस्‍थित केले होते. त्‍यांनी आपले सदस्‍यत्‍व पुन्‍हा रिन्‍यूव्‍ह केले नाही असे सांगण्‍याचा प्रयत्‍नही यावेळी झाला. वेळीप यांना भाजपमधून बेदखल तर करण्‍यात आले नाही ना? असा प्रश्‍‍न त्‍यामुळे आता सर्वांना पडला आहे.

अन्‌ काब्राल ‘मुख्‍यमंत्री’

‘माझी मुख्‍यमंत्री म्‍हणून नेमणूक केल्‍यास मी तेसुद्धा पद स्‍वीकारायला तयार आहे’ अशा प्रकारचे वक्‍तव्‍य कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी एकदा केले होते. अर्थातच त्‍यांचे हे वक्‍तव्‍य तसे सीरियस नव्‍हते. तुम्‍हाला मंत्रिपद दिल्‍यास तुम्‍ही घेणार का? असा प्रश्‍‍न विचारला असता, ‘मंत्रीच काय मुख्‍यमंत्री केले तरीही ते पद स्‍वीकारण्‍यास मी तयार आहे’ असे त्‍यांनी मजेने म्‍हटले होते. मागच्‍या आठवड्यात असाच प्रसंग पुन्‍हा एकदा घडला. अवेडे येथे अवेडे-पारोडा लायन्‍स क्‍लबच्‍या अधिकारग्रहण सोहळ्‍याला प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित असलेले काब्राल यांचा उल्‍लेख या क्‍लबचे मावळते अध्‍यक्ष उज्‍ज्‍वल गावस देसाई यांनी अनावधनाने ‘मुख्‍यमंत्री’ असा केला आणि नंतर सूत्रसंचालन करणाऱ्या माफाल्‍द फर्नांडिस यांनी काब्राल मुख्‍यमंत्री झाल्‍यास आम्‍हालाही ते आवडेल, असा उल्‍लेख केला. मात्र, ‘मी पुढे काय होणार हे सर्व लोकांवरच अवलंबून आहे’ असे सांगून काब्राल यांनीही यावेळी वेळ मारून नेली. शेवटी इच्‍छा, आशा ही प्रत्‍येकाला असतेच.

दामूंचा अभ्यास

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक अलीकडे कोणत्याही गोष्टीवर काही विचारले की अभ्यास करून सांगतो असे सांगतात. आपण चटकन प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी नाही असे सांगण्यासही ते विसरत नाहीत. दामू यांनी कोण, कुठे काय बोलले याची माहिती त्यांना लगेच पुरवणारा साहाय्‍यकांचा संच आता उभा करण्याची वेळ आली आहे. प्रसारमाध्यमांत सरकार आणि पक्षाच्या बाजूने, विरोधात काय छापून आले याची माहिती पुरवणारे पथक त्यांच्याकडे आहे. त्याच धर्तीवर समाज माध्यमांवर कोण काय बोलले, कोणता व्हिडिओ व्हायरल होत आहे याची माहिती आता त्यांनी मिळवणे गरजेचे बनले आहे. अभ्यास करून सांगतो हे फार काळ चालणारे नाही अशी चर्चा आहे.

काँग्रेस आहे कुठे?

सध्या विरोधी काँग्रेस पक्ष आहे कुठे? असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाला आणि सरकारला कोंडीत पकडता येतील असे अनेक प्रसंग गेल्या काही दिवसांत घडले. पत्रकार परिषदांच्या पुढे काँग्रेस पक्ष सरकलाच नाही. मध्यंतरी राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या आग्रहास्तव आंदोलने केली, पण त्यात सातत्य राहिलेले नाही. राज्यघटना वाचवायचे कार्यक्रम होत आहेत. मात्र त्यानिमित्ताने किती नवे कार्यकर्ते जोडले जात आहेत हा प्रश्‍‍नच आहे. काँग्रेस एकेक संधी हातची गमावत चालल्याची भावना पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची झाली आहे. यातून निर्माण होणारे नैराश्य पक्षाला महागात पडेल अशी चर्चा आहे.

कर्मचाऱ्यांना भीती आता ‘एआय’ची?

पंचायत सचिवांना कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानावर आधारित उपस्थिती प्रणालीचं इतके टेन्‍शन का, असा उपरोधिक सवाल करत मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांच्या उशिरा कामावर येण्याच्या नैसर्गिक अधिकारांवर थेट घाला घातला आहे. पंचायतींतील काही अधिकारी वेळेवर येणे, कामावर लक्ष देणे आणि जबाबदारी स्वीकारणे या नव्या प्रणालीला विरोध करत आहेत, असे स्पष्ट वक्तव्य करत त्यांनी उपस्थितांना मशीनपेक्षा अधिक ‘चतुर’ प्रतिक्रिया दिली. ‘अहो, आता तर यंत्रच तुमचे वेळेवर येणे नोंदवणार आहे. मग चहा पिऊन यायचं कारण तरी काय?’ असा प्रश्‍‍न विचारला असता, काही सचिवांना गुगलवर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ‘उपस्थितीचा अडथळा’ असंच वाटू लागले असावे. गुदिन्होंनी स्पष्ट केले की, ही प्रणाली लवकरच लागू होणार आहे. त्यामुळे वेळेवर न येणाऱ्यांनी आपल्या नैसर्गिक सवयींना कृत्रिम रामराम म्हणायला सुरवात करावी. कारण यापुढे ‘साहेब आले होते... पण लगेच बाहेर गेले’ हे चालणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT