Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: लाभार्थ्यांना पावणार 'बप्पा', सरकारकडून 60 कोटींच्या खर्चाला मंजूरी; आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश

Welfare Schemes: कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींना गेल्या दोन-तीन महिन्यांचा एकत्रित लाभ येत्या आठवड्यात मिळणार आहे. सुमारे ६० कोटी रुपये यासाठी सरकारला खर्च करावे लागणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींना गेल्या दोन-तीन महिन्यांचा एकत्रित लाभ येत्या आठवड्यात मिळणार आहे. सुमारे ६० कोटी रुपये यासाठी सरकारला खर्च करावे लागणार आहेत. हे लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात गणेश चतुर्थीपूर्वी जमा करा, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वित्त खात्याच्या आढावा बैठकीत दिला. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही गणेश चतुर्थीपूर्वीच भरपाई दिली जावी, असेही मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितले आहे.

राज्य सरकारने यंदा महसुली शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. असे असले तरी दैनंदिन खर्चासाठी लागणारी गंगाजळी आणि महसूल यांचे गणित जुळत नसल्याने बऱ्याचदा दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, गृहआधार आदी योजनांचा लाभ तिमाही पद्धतीने दिला जातो. लाडली लक्ष्मी योजनेचे अनेक अर्ज गेल्या तीन वर्षांपासून पडून असल्याची चर्चा विधानसभेच्या गेल्या अधिवेशनातही झाली होती. सरकारने पावसाळ्यात नुकसान सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी भरपाई देण्याचे आश्वासन विधानसभेत दिले आहे. त्यासाठी जमिनीची मालकी वा कूळ म्हणून नोंंद नसलेल्यांकडून प्रतिज्ञापत्र घेऊन अशी भरपाई देण्याचे ठरविले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या सामाजिक योजनांचे प्रलंबित पैसे गणेश चतुर्थीपर्यंत लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर किती लाभार्थ्यांचे पैसे मिळणे प्रलंबित आहेत, याची माहिती वित्त खात्याने संबंधित खात्यांकडून आजच मागवून घेतली आहे. विविध खात्यांमार्फत सुरू असलेल्या सामाजिक योजनांचाही त्यांनी बैठकीत आढावा घेतला. प्रत्येक योजनेचे लाभार्थी वाढण्यासाठी कोणते प्रयत्न करण्यात येतात आणि खरा लाभार्थी ओळखण्यासाठी पडताळणीसाठी अवलंबण्यात येणारी पद्धती किती सक्षम असते, याची विचारणाही त्यांनी बैठकीत केली.

जनतेला आर्थिकदृष्ट्या आधार देणाऱ्या विविध योजना राज्य सरकारकडून राबवण्यात येत आहेत. त्यातील काही योजनांचा लाभ गेल्या काही महिन्यांपासून जनतेला मिळालेला नाही. याबाबत विरोधी आमदारांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मात्र सर्व खात्यांच्या आढावा मुख्यमंत्री सध्या घेत असून ही बैठक सर्वसाधारण प्रक्रियेचाच भाग होता, असे सांगण्यात आले.​ वित्त सचिव डॉ. व्ही. चंदावेलू यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा या बैठकीत आढावा सादर केला.

विधानसभेत उमटले होते पडसाद

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कल्याणकारी योजनांच्या लाभाचाही प्रश्न चर्चेत आला होता. हा लाभ गणेश चतुर्थीपूर्वी मिळण्यासाठी राज्य सरकारच्या सर्वसाधारण खात्यात पुरेशी शिल्लक आहे का, याची चाचपणी करणे आणि विविध माध्यमांतून निधीची उपलब्धता करून ती या योजनांच्या अंमलबजावणीकडे वळविणे ही प्रक्रिया करण्यासाठी वित्तमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी आज ही बैठक घेतली.

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या अडचणी

७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याने तत्पूर्वी या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी वित्त खात्याचे अधिकारी आणि या योजना राबवणाऱ्या खात्यांचे प्रमुख यांची मंत्रालयात बैठक घेऊन आढावा घेतला. कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा कऱण्यासाठी असलेल्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या.

गरजू लाभार्थींंना वंचित ठेवू नका!

अधिवेशनात मुरगावचे सत्ताधारी आमदार संकल्प आमोणकर यांनी गृह आधार योजनेच्या लाभार्थीला तीन महिने आर्थिक लाभ दिल्यानंतर तिचा लाभ अचानकपणे बंद करण्यात आला, त्यावेळी तिने केलेल्या चौकशीत, पडताळणीत ती महिला मरण पावल्याचे आढळून आल्याचे त्या महिलेलाच सांगण्यात आल्याची बाब उघड केली होती. बोगस लाभार्थी शोधा; पण गरजू लाभार्थ्याला वंचित ठेवू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत ठणकावून सांगितले.

या योजनांचा मिळेल लाभ

दयानंद सामाजिक सुरक्षा

गृह आधार

लाडली लक्ष्मी

गृह विज्ञान विद्यार्थ्यांसाठीची इंटर्नशीप

गाव व पालिका बाल समिती अनुदान

वात्सल्य

प्रभात

ममता

स्वावलंबन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT