CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Margao Development: मडगावचा चेहरा-मोहरा बदलणार! पणजीच्या धर्तीवर होणार विकासकामे; कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

CM Pramod Sawant promises Panaji-style development for Margao: मडगाव शहर ही दक्षिण गोव्याची एक प्रकारे राजधानीच आहे, त्यामुळे सरकार या शहराकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करणार नाही. पणजीच्या धर्तीवर मडगावचाही सर्वांगीण विकास होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी (15 एप्रिल) दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मडगाव शहर ही दक्षिण गोव्याची एक प्रकारे राजधानीच आहे, त्यामुळे सरकार या शहराकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करणार नाही. पणजीच्या धर्तीवर मडगावचाही सर्वांगीण विकास होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी (15 एप्रिल) दिले. दिगंबर कामत यांची मंत्रिपदी वर्णी लागेल, अशी चर्चा चालू असतानाच मडगावकरांसाठी लवकरच ‘अच्छे दिन’ येणार, असे सूचक उद्‍गारही त्यांनी काढले.

२०२७ मध्येही भाजपच गोव्यात (Goa) सत्तेवर येणार असून त्यावेळी भाजप आमदारांची संख्या २७ पेक्षा जास्त असणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याहस्ते प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हेही उपस्थित होते.

मडगावात (Margao) आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री सावंत यांनी मडगावकरांना आश्वस्त करताना, मागच्या तीन वर्षात मडगावसंदर्भात आमदार दिगंबर कामत यांनी जे प्रस्ताव सरकारसमोर मांडले ते सर्व पूर्ण केले गेले असून राहिलेली कामेही येत्या दोन वर्षात पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले. भाजप कार्यकर्त्यांची यावेळी गर्दी होती.मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, अन्य नगरसेवक, भाजप मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

मडगावात दिसतील नवे प्रकल्प!

आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले,की येणाऱ्या काळात मडगाव शहरात अनेक प्रकल्प उभे झालेले दिसून येणार आहेत. मडगाव शहराचा भौतिक विकास करताना लोकांचे राहणीमान उंचवावे, याचाही विचार भाजप सरकार करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

पालिका कर्मचाऱ्यांसाठी तरतूद

पालिका कर्मचाऱ्यांच्या हितासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा मिळतील. येत्या दोन महिन्यांत त्या संदर्भात घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT