School Dainik Gomantak
गोवा

Goa: राज्यातील खाजगी आणि सरकारी महाविद्यालयांचे वर्ग अद्याप बंदच

हरमल (Harmal) पंचक्रोशी महाविद्यालयाचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होऊन 25 दिवस उलटले, तरी राज्यातील अन्य खाजगी व सरकारी महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग अद्याप सुरु झाले नाहीत.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मींकांत पार्सेकर (Laxminkant Parsekar) हे अध्यक्ष असलेल्या हरमल पंचक्रोशी महाविद्यालयाचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होऊन 25 दिवस उलटले, तरी राज्यातील अन्य खाजगी व सरकारी महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग अद्याप सुरु झाले नाहीत. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे राज्यातील महाविद्यालयात शिकणाऱ्या बहुतांश मुलांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेला असल्याने व राज्यात कोरोना नियंत्रणात असल्याने लवकरात लवकर किमान महाविद्यालये तरी सुरु करा असी मागणी होत शाळा आहे.

सोशल मिडियावर (Social media) महाविद्यालयीन मुलांतर्फे ही मागणी होत आहे. याबाबत हरवळे येथील एक पालक शिवराम नाईक यांनी सांगितले मोबाईलची योग्य रेंज घरात मिळत नसल्याने आपल्या मुलाला रेंजसाठी बाहेर इकडे तिकडे फिरावे लागते. पावसाचे दिवस असल्याने रेंज मिळत नाही. सध्या कोरोना नियंत्रणात आहे. बाजार भरतात, बसेस सुरु झाल्या असून त्या भरुन जातात. आम्ही बसमधून फिरतो. मग मुलांना कॉलेजात जाण्यास काय अडचण आहे?. गेले दिड वर्ष मुले घरात राहून कंटाळली आहेत. एक वर्ष आॅनलाईन वर्ग घेऊन शिकले.

निदान आतातरी प्रत्यक्ष वर्ग सुरु करावेत. अशी माझी सरकारकडे विनंती आहे. असे नाईक म्हणाले. दुसरे थिवी येथील एक पालक राजन पेडणेकर हे म्हणाले की महाराष्ट्रात कोरोना जास्त आहे तरी तेथील सरकारने 7 आॅक्टोंबर पासून हायस्कूल व महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. गोवा सरकारनेही येत्या महिन्यापासून किमान उ.मा. विद्यालये व कॉलेज सुरु करावेत त्यानंतर हायस्कूल सुरु करावीत. कारण घरात मुले अभ्यास करत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rent-a-Car: 'निर्णय मागे घ्या' नाहीतर...! रेन्ट अ कार व्यावसायिकांची पणजीत धडक; वाहतूक खात्याचा परवाना निर्णयाविरुद्ध संताप

Goa TET 2025: शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेत 'विवाहबाह्य संबंधांवर' उतारा, परीक्षार्थी संतप्त; समाज माध्यमांवर उठली टीकेची झोड

Goa Drug Bust: गोवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 1 कोटींच्या अंमली पदार्थासह बेलारुसच्या महिलेला अटक; तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Illegal Nightclubs Goa: गोव्यातील नाईट क्लब, डान्सबार अन् डिस्कोथेक बेकायदेशीर, राज्याच्या कायद्यात तरतूदच नाही; बड्या अधिकाऱ्याच्या खुलाशाने खळबळ

Arpora Nightclub Fire Case: 25 मृत्यूंची गंभीर दखल! हडफडे दुर्घटनाप्रकरणी मानवाधिकार आयोगाची मोठी ॲक्शन; मुख्य सचिव अन् पोलीस महासंचालकांना समन्स

SCROLL FOR NEXT