Goa Church Marriages Dainik Gomantak
गोवा

Goa Church Marriages: चर्चने विवाह नोंदणी पत्रके वेळेत जमा न केल्यास 10 हजार रूपये दंड...

रजिस्ट्रार ऑफिस करणार दंडात्मक कारवाई

Akshay Nirmale

Goa Church Marriages: चर्चमध्ये विवाह सोहळा पार पाडल्यानंतर विवाह नोंदणी पत्रकाची नोंदणीकृत प्रत नागरी नोंदणी कार्यालयात जमा करण्यास चर्चने विलंब केल्यास आता दंड म्हणून शुल्क आकारणी केली जाणार आहे.

हे प्रमाणपत्र जमा करण्यास चार महिने म्हणजे 120 दिवस विलंब केल्यास कायदा आणि न्यायव्यवस्था विभाग 2000 रुपये शुल्क आकारेल.

विवाह नोंदणी पत्रके नागरी नोंदणी कार्यालयात जमा करण्यास विलंब होत असल्याचे लक्षात आल्यानंतर हे शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जर हा विलंब 120 ते 180 दिवस इतका असेल तर त्याकरीता 5,000 रुपये दंड आकारला जाईल. जर विलंब 180 ते 365 दिवस म्हणजे एक वर्षापर्यंत असेल तर हे शुल्क 7,500 रुपये असेल. आणि एका वर्षाहून अधिक विलंबासाठी 10,000 रुपये दंड ठोठावला जाईल.

बऱ्याचदा लग्न झालेली अनेक जोडपी त्यांच्या विवाह प्रमाणपत्रांसाठी कार्यालयात संपर्क साधतात. पण त्यांचे विवाहाबाबतची पत्रके नागरी नोंदणी कार्यालयात पाठविण्यास काही पुजाऱ्यांनी विलंब केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधितांना प्रमाणपत्र मिळत नाही.

या विलंबामुळे, गोवा आणि दमणच्या आर्कडायोसीसचे कुलपती फादर रोमियो मॉन्टेरो यांनी गेल्या महिन्यात सर्व रहिवासी पुजाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत नागरी नोंदणी कार्यालयात विवाह नोंदणी पत्रके पाठवण्याची सूचना केली होती.

जर ही पत्रके संबंधित कार्यालयाकडे वेळेत पाठवली गेली नाहीत तर, नागरी प्राधिकरणाद्वारे विहित विवाहाची नोंदणी केली जाणार नाही. त्यामुळे संबंधित विवाहीत जोडप्याला अडचणी येऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT