37th National Games Goa: क्रीडा मंत्री गोविंद गावडे म्हणाले, मुलगीही स्पर्धेत खेळतीय... पण तिला 'चीअर' करणार नाही!

गोव्याच्या नेटबॉल संघात क्रीडा मंत्र्यांच्या कन्येचाही समावेश
Sports Minister Govind Gaude on 37th National Games Goa
Sports Minister Govind Gaude on 37th National Games GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Sports Minister Govind Gaude on 37th National Games: गोव्यात 19 ऑक्टोबरपासून 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस सुरवात होणार आहे. दरम्यान, गोव्याच्या नेटबॉलच्या मुलींच्या संघात राज्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांची कन्याही असणार आहे.

तथापि, मुलीला प्रोत्साहन देणार नाही, असे गोविंद गावडे यांनी म्हटले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मी माझ्या मुलीचा किंवा राज्याचा जयजयकार करणार नाही. क्रीडा मंत्री म्हणून मला तटस्थ राहायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Sports Minister Govind Gaude on 37th National Games Goa
MLA Disqualification: काँग्रेसमधून फुटून भाजपत आलेल्या 8 आमदारांसह सभापती तवडकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

मुलगी श्रावणी (वय 16) गोव्याच्या नेटबॉल संघाची सदस्य आहे. त्याचा मला अभिमानही आहे. हा संघ राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होणार आहे. श्रावणी सध्या फोंडा शहरातील एका निवासी शिबिरात प्रशिक्षण घेत आहे.

पण मी तिला किंवा नेटबॉल संघाला किंवा राज्याचा जयजयकार करणार नाही. कारण मी आयोजक आहे. गोवा या स्पर्धेचे यजमान राज्य आहे. आणि मी राज्याचा क्रीडा मंत्री आहे. गोवा माझ्या हृदयात आहे याबाबत दुमत नाही.

पण मला तटस्थ राहावे लागेल. त्यामुळे मी नॅशनल गेम्समधील सर्व स्पर्धकांचा जयजयकार करेन. मी सामन्यांना उपस्थित राहू शकणार नाही. कारण सर्व खेळांचे नियोजन सुरळीत होण्यासाठी ते सुनिश्चित करण्यासाठी सर्व ठिकाणी फिरावे लागेल.

Sports Minister Govind Gaude on 37th National Games Goa
गोव्यात 24 नोव्हेंबरपासून Royal Enfield Motoverse 2023; यंदा काय असणार खास जाणून घ्या...

दरम्यान, गोवा नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष शुभम नार्वेकर म्हणाले की, श्रावणी शाळेपासूनच नेटबॉल खेळतीय. तिने विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. तिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट नेमबाज म्हणून गौरविण्यात आले आहे.

सध्या ऑगस्टपासून फोंड्यात शिबिर सुरू आहे. ते राष्ट्रीय स्पर्धेपुर्वी संपेल. गतवेळी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत गुजरातमध्ये गोवा संघ नेटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नव्हता. यंदा प्रथमच नेटबॉलचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत खेळत आहे. सुवर्णपदक जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे.

गोव्यातील राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गोव्यात 28 ठिकाणी या स्पर्धा खेळल्या जातील. यात 10 हजारहून अधिक खेळाडू सहभागी होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com